लग्नाला येणारे पाहुणे आपले आहेत; मात्र कोरोना आपला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:34 AM2021-02-23T04:34:37+5:302021-02-23T04:34:37+5:30
निर्भया व स्वेरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोरोना जनजागृती पथनाट्य अभियान’चे आयोजन केले होते. या पथनाट्याचे उदघाटन पंढरपूरचे पोलीस उपविभागीय ...
निर्भया व स्वेरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोरोना जनजागृती पथनाट्य अभियान’चे आयोजन केले होते. या पथनाट्याचे उदघाटन पंढरपूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पो.नि. अरुण पवार, निर्भया पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर उपस्थित होते. स्वेरीचे इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, प्रा. यशपाल खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीचे विद्यार्थी वैष्णवी रोटे, प्रशांत माळी, मदन पाटील, अभिजित रोटे, ऐश्वर्या विरधे, सारिका मोरे, सोनाली गायकवाड व शीतल ताटे यांनी पथनाट्य सादर केले.
या पाच प्रसंगावर पथनाट्य
आरोग्य व्यवस्थित आहे; परंतु मला काही होत नाही. या भ्रमात फिरणाऱ्या व्यक्तींचे प्रबोधन. पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी काळजी घ्यावी. लग्न सोहळ्यात गर्दी करू नका व पोलीस दिसला तरच मास्कचा वापर करणे या पाच प्रसंगावर पथनाट्य आधारित होते. शहरातील छत्रपती शिवाजी चौक, पांडुरंग मंदिराच्या नामदेव पायरी व भादुले चौक या महत्त्वाच्या ठिकाणी पथनाट्याचे प्रयोग सादर करण्यात आले.
फोटो ओळी :::::::::::::::::::
पथनाट्याद्वारे कोरोनाबाबत जनजागृती करताना स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे पथक.