चार भिंतीच्या आत पार पडू लागले लग्नसोहळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:15 AM2021-06-22T04:15:58+5:302021-06-22T04:15:58+5:30
ढोल-ताशांच्या गजरात विद्युत रोषणाईनं लाडकीचं, लाडक्याचं लग्न करीन अशी आशा उराशी बाळगून अनेक मंडळी होती, परंतु कोरोनाने कुणालाच मान ...
ढोल-ताशांच्या गजरात विद्युत रोषणाईनं लाडकीचं, लाडक्याचं लग्न करीन अशी आशा उराशी बाळगून अनेक मंडळी होती, परंतु कोरोनाने कुणालाच मान वर करू दिली नाही. सरतेशेवटी या सर्व मंडळींनी शासनाच्या कडक आदेशाची पायमल्ली होऊन त्यांच्या कारवाईस सामोरे जावे लागेल या भीतीने चार भिंतींच्या आत घरामध्येच लग्न लावायला सुरुवात केली. ना करवले, ना कुरवल्यांची गर्दी. फक्त नवरा, नवरी मुला-मुलींचे मामा व लग्न लावणारे ब्राह्मण काका यांच्या व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश न देता घरातील हॉलमध्येच या पाच ते सहा लोकांना उभे राहता येईल एवढा लहानसा लाकडी फळ्या टाकून स्टेज करून अतिशय साधेपणाने लग्न लावायला सुरुवात केली. मोडनिंब येथील दत्तनगर भागामध्ये संदेश व रूपाली यांचा विवाह सोहळा सोशल डिस्टन्स पाळून पार पडला.
---
लाखों रुपयांचा वाचला खर्च
मंगल कार्यालयामध्ये दिमाखदार लग्न करायची दोन्ही मंडळींची हौस असतानासुद्धा साधेपणाने हा विवाह सोहळा पार पाडल्याचे नवरदेवाचे भाऊ सागर पावणे यांनी सांगितले.
काही असो, पण या निमित्ताने लाखो रुपयांचा खर्च मात्र वाचला. प्रत्येक गावागावांमध्ये असा साध्या पद्धतीचा उपक्रम राबविल्यास पैशाची तर बचत होईलच, परंतु भविष्यात केवळ लग्नामुळे कर्जबाजारी होणाऱ्या अनेक कुटुंबांना यापासून दिलासा मिळेल, असे रूपाली व संदेश यांनी सांगितले.
---