आठवडा बाजाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करणार : प्रांताधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:26 AM2021-09-06T04:26:41+5:302021-09-06T04:26:41+5:30

माळशिरस तालुक्यातील आठवडा बाजार सुरू करण्याबाबत आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, प्रांताधिकारी विजय देशमुख, माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत शिवरत्न ...

Weekly market report to be submitted to District Collector: Prantadhikari | आठवडा बाजाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करणार : प्रांताधिकारी

आठवडा बाजाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करणार : प्रांताधिकारी

Next

माळशिरस तालुक्यातील आठवडा बाजार सुरू करण्याबाबत आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, प्रांताधिकारी विजय देशमुख, माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत शिवरत्न बंगल्यावर बैठक पार पडली. यावेळी रणधैर्य आठवडा बाजार संघटनाचे पदाधिकारी, भाजपचे मुक्तार कोरबू, सतीश व्होरा, विलास क्षीरसागर, अकलूज नगरपरिषद कार्यालयीन अधीक्षक बाळासाहेब वाईकर यांच्यासह व्यापारी उपस्थित होते. यावेळी व्यापाऱ्यांच्या वतीने प्रांताधिकारी देशमुख यांना निवेदन देण्यात आले.

माळशिरस तालुक्यामध्ये शनिवारी एकाच दिवशी ७१३१ एवढे कोविड लसीकरण झाले आहे. आजपर्यंत एकूण १ लाख ३७ हजार ८ एवढे लसीकरण झाल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील कोरोनाची परिस्थिती व शासनाचे धोरण याबाबत माहिती घेऊन जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करू. कोरोनामुळे शेतकरी, व्यापारी, लहान-मोठ्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे आ. रणजितसिंह मोहिते-पाटील म्हणाले.

फक्त व्यापाऱ्यांचे हित पाहू नका

आठवडा बाजार तसेच सर्व बाजारपेठा सुरू करण्यास काहीच हरकत नाही. परंतु, सर्व व्यापारी व ग्राहकांना कोविडचे नियम पाळण्यास सांगा. व्यापार चालू-बंदमुळे सर्व विस्कळीत होत आहे. अकलूजच्या भाजी मंडईत जाऊन पाहा व नंतरच निर्णय घ्या. एकही विक्रेता नियम पाळत नाही. फक्त व्यापारी मंडळींचे हित पाहू नका, सामाजिक जबाबदारीचेही भान ठेवा, असे जयसिंह मोहिते-पाटील म्हणाले.

040921\50391842-img-20210904-wa0130.jpg

अकलूज आठवडा बाजार सुरु करण्या संदर्भात प्रांताधिकारी विजय देशमुख यांना व्यापा-यांनी निवेदन दिले

Web Title: Weekly market report to be submitted to District Collector: Prantadhikari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.