आठवडा बाजार भरवू नका म्हणून सांगणाऱ्या सर्कलच्या श्रीमुखात लगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:28 AM2021-08-18T04:28:11+5:302021-08-18T04:28:11+5:30
ग्रा.पं. सदस्य श्रीनिवास करे, सदाशिव करे, बिरा कांबळे, रंगनाथ बाळू मेटकरी, आगतराव गावडे, हरिदास सदाशिव घुटूकडे यांच्यासह इतर तिघे ...
ग्रा.पं. सदस्य श्रीनिवास करे, सदाशिव करे, बिरा कांबळे, रंगनाथ बाळू मेटकरी, आगतराव गावडे, हरिदास सदाशिव घुटूकडे यांच्यासह इतर तिघे अशी त्या संशयित आरापींची नावे आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून जवळा मंडलाधिकारी धनंजय इंगोले, तलाठी कुमाररवी राजवाडे, घेरडी ग्रामपंचायत कर्मचारी तुकाराम गळवे व बसवेश्वर लंबे असे मिळून सोमवारी घेरडी गावामध्ये आठवडा बाजार भरवू नये, लोकांनी एकाच ठिकाणी गर्दी करू नये, म्हणून ग्रामपंचायत सभा मंडपाजवळ आले. तेव्हा ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवास करे हे लोकांची गर्दी करून थांबले होते. त्यांना गर्दी करू नका, असे सांगण्यात आले तेव्हा करे यांनी, तुमचे आमच्या गावात काय काम आहे, आमचे आम्ही बघून घेतो, असे म्हणून सर्कलांची गच्ची धरली व बाचाबाची करीत त्यांच्या श्रीमुखात लगावली. सदाशिव करे यांनी त्यांच्या शर्टाची कॉलर धरून त्यांना मेन चौकात ओढत आणले. यावेळी त्यांच्या जोडीला इतर सातजणांनी मंडलाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी केली.