कर्तृत्ववान माणसांमुळे सुसंस्कृत समाज घडतो, सुशीलकुमार शिंदे यांचे मत, हन्नूरच्या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात नेतेमंडळींनी मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 11:46 AM2018-01-10T11:46:46+5:302018-01-10T11:48:36+5:30
हन्नूर (ता. अक्कलकोट) येथे स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भरमशेट्टी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त के. बी. प्रतिष्ठानतर्फे त्यांच्यावर लिहिलेल्या ग्रंथाचे प्रकाशन शिंदे यांनी केले.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
चपळगाव दि १० : स्वर्गीय काशिनाथ भरमशेट्टी हे एक निगर्वी, सुस्वभावाचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जाण्याने या परिसराचे नुकसान झाले आहे. त्यांच्यासारख्या कर्तृत्ववान माणसांमुळेच सुसंस्कृत समाज घडतो. त्यांचे अधुरे कार्य पुढे नेणे हीच त्यांना पुण्यस्मरणाच्या निमित्ताने खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
हन्नूर (ता. अक्कलकोट) येथे स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भरमशेट्टी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त के. बी. प्रतिष्ठानतर्फे त्यांच्यावर लिहिलेल्या ग्रंथाचे प्रकाशन शिंदे यांनी केले, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे गुरुजी होते. यावेळी आ. सिद्धाराम म्हेत्रे, माजी आ. सिद्रामप्पा पाटील, माजी आ. शामल बागल, शिवशरण पाटील, बाळासाहेब शेळके, सुरेश हसापुरे,सभापती सुरेखा काटगाव,कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, उपसभापती प्रकाश हिप्परगी, डॉ. सुवर्णा मलगोंडा, बाळासाहेब मोरे, सुदीप चाकोते, चेतन नरोटे, सिद्धार्थ गायकवाड, दिलीप बिराजदार, विश्वनाथ भरमशेट्टी, राजू भरमशेट्टी, डॉ. नेहा भरमशेट्टी, क्रांती भरमशेट्टी, सचिन भरमशेट्टी, व्यंकट मोरे, बब्रुवाहन माने उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ. नेहा भरमशेट्टी यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रा.मधुकर जाधव यांनी संपादित केलेल्या ‘काशिनाथ एक दीपस्तंभ’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. के. बी. प्रतिष्ठान बहुउद्देशीय समाजसेवा प्रतिष्ठानच्या नामफलकाचे उद्घाटनही आ. म्हेत्रे यांनी केले.
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याची ताकद भरमशेट्टी यांच्याकडे होती.त्यांच्या हयातीच्या काळात त्यांनी कुरनूर धरण, आठ एकर स्लॅबबद्दल प्रभावीपणे काम करून या भागातील जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. यावेळी सिद्रामप्पा आलुरे, आ. सिद्धाराम म्हेत्रे, सिद्रामप्पा पाटील यांची भाषणे झाली. काशिनाथ भरमशेट्टी यांच्यामुळेच आ. म्हेत्रे व माजी आ. सिद्रामप्पा पाटील यांच्यामध्ये मनोमिलन झाल्याचे पाटील यांनी सांगितले. अशपाक बळोरगी,भीमा कापसे, अण्णाप्पा अळ्ळीमोरे, राजशेखर पाटील, काशिनाथ गोळ्ळे, भारत जाधव, स्वामीनाथ हरवाळकर, निलप्पा घोडके, सोपान निकते, शैलेश पाटील, इसहाक पटेल, डॉ. आप्पासाहेब उमदी, चंद्रकांत जंगले, संजय बाणेगाव, सातलिंग शटगार, अरुण जाधव, बसवराज सुतार, सोपान निकते, मल्लिनाथ भरमशेट्टी, विठ्ठल भरमशेट्टी, आप्पाशा हताळे, अनिल बिडवे, निरंजन हेगडे, नरेंद्र जंगले उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश सुरवसे व हत्तुरे यांनी केले तर कार्यक्रमाच्या शेवटी आभार नीलेश भरमशेट्टी यांनी मानले.