अन् ऐतिहासिक निंबाळकर वाड्यातील विहीर अतिवृष्टीमुळे भरून वाहू लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 01:29 PM2020-09-19T13:29:12+5:302020-09-19T13:31:29+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग
पटवर्धन कुरोली; भाळवणी (ता. पंढरपूर) येथील ऐतिहासिक निंबाळकर वाड्यासमोरील ३५० वर्षापूर्वीचे वडाचे झाड जमीनदोस्त झाले आहे, तर वाड्यातील विहीर ओसंडून वाहू लागली आहे.
पंढरपुर - मागील काही दिवसांपासून पंढरपुर तालुक्यात अतिवृष्टी होत आहे. काल पटवर्धन कुरोली, व भाळवणी ( ता.पंढरपूर ) मंडलात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे़ या अतिवृष्टीमुळे भाळवणी तेथील ऐतिहासिक निंबाळकर वाड्यासमोरील ३५० वर्षे जुने वडाचे झाड उन्मळून पडले आहे. वाड्यातील ऐतिहासिक विहीर अतिवृष्टीमुळे वाहू लागली आहे.निसगार्चे हे रौद्ररुप प्रथमच पाहयायला मिळत आसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
मागील २० वर्षातील सर्वात मोठा पाऊस यावर्षी पंढरपुर तालुक्यात पडला असून अनेक पिकात, घरात पाणी जाऊन पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील काही ऐतिहासिक वस्तुंना ही फटका बसत आसल्याचे चित्र आहे. शुक्रवार झालेल्या अतिवृष्टीमुळे भाळवणी येथील ऐतिहासिक निंबाळकर वाड्यासमोरील३५० वर्षापूर्वीचे वडाचे झाड जमीनदोस्त झाले आहे. तर याच ऐतिहासिक वाड्यातील पाण्याची विहीर इतिहासात प्रथमच ओसंडुन वाहू लागली आहे. निसर्गचया प्रलयातून ऐतिहासिक वास्तू ही सुटत नसल्याचे चित्र आहे. ऐतिहासिक वाड्यातील या घटना पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.