पंढरीचे दारी स्वच्छतेची वारी उपक्रमामुळे शौचालयाच्या वापरात वाढ...!

By admin | Published: July 1, 2017 01:25 PM2017-07-01T13:25:21+5:302017-07-01T13:25:21+5:30

आॅनलाइन लोकमत सोलापूर

Wells In a bedchick release © Does this ac-16 Swick In Whatever Inch Whatever In In Inch, Being In In In Inch Inch In Inch In Whatever times this business, | पंढरीचे दारी स्वच्छतेची वारी उपक्रमामुळे शौचालयाच्या वापरात वाढ...!

पंढरीचे दारी स्वच्छतेची वारी उपक्रमामुळे शौचालयाच्या वापरात वाढ...!

Next


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १ : जिल्हा पकिषदेने पंढरीचे दारी स्वच्छतेची वारी हा अभिनव उपक्रम राबविला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या अभियानाने अभिनव रूप धारण केले आहे.
पिवळ्या रंगातील टी शर्ट घातलेले स्वयंसेवक वारकरी बाबांधवांची सेवा करणेत दंग आहेत. संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावर नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव तर अकलूज, बोरगाव, पिराचीकुरोली या ठिकाणी शौचालयाची सुविधा करणेत आली आहे. दररोज काही हजार टन पडणारा मैला बंदिस्त झाला असून त्याचे योग्य रितीने व्यवस्थापन झाले आहे.
या मार्गावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी स्वत: फिरून पालखी मागार्ची पाहणी केली आहे.
शौचालयाचे ठिकाणी पाण्याची सुविधा, गात धुण्यासाठी साबणाची सुविधा करणेत आली आहे. तर शौचालयात घेऊन जाणेसाठी लहान बादल्याची सोय केली आहे. तर बॅरेलमधून पुरेशा पाण्याची सोय करणेत आली आहे. २ हजार शौचालये चे माध्यमातून भाविकांना सेवा दिली जात आहे. दररोज मुक्कामाचे ठिकाणी तसेच विसाव्याच्या ठिकाणी वारकरी पोहचणेपुर्वी शौचालये बसविली जातात. पंढरीचे दारी स्वच्छतेची वारी हा उपक्रम दि. ४ जुलै पर्यंत राबविणेत येत आहे.
---------------------------
कलाकार करतात भाविकांचे प्रबोधन
पालखी मार्गावर दोन्ही पालखी सोहळ्यात स्वच्छता दिंडीचे कलाकार स्वच्छतेवर प्रबोधन करीत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात १०७ कलाकार तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील स्वच्छता दिंडीमध्ये ७० कलाकार कलेच्या माध्यमातून मार्गदर्शन करीत आहेत. १७ चित्ररथ या दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत. कलाकार गेल्या १२ वर्षा पासून स्वच्छतेवर प्रबोधन करीत आहेत. प्रबोधनामुळे बदल दिसत आहेत. शासनाने शौचालय उभ करून भाविकांची चांगली सोय केली आहे. पंढरीचे दारी स्वचछतेची वारी हा उपक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी चांगले नियोजन करून प्रभावी अंमल बजावणी केली आहे.

Web Title: Wells In a bedchick release © Does this ac-16 Swick In Whatever Inch Whatever In In Inch, Being In In In Inch Inch In Inch In Whatever times this business,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.