कोरोनाची लक्षणं आहेत ?.. आधी पैशाचं बोला; सोलापुरातील खासगी रूग्णालयात रूग्णांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 12:30 PM2020-06-30T12:30:54+5:302020-06-30T12:36:29+5:30

Sting Operation; घाबरलेल्या रुग्णांवर खेकसूनच संवाद : गरीब रुग्णांचे होतात हाल, सिव्हिल हॉस्पिटलने पाठविलेल्या रुग्णाकडून पैसे घेऊनच होतात उपचार

What are the symptoms of corona? .. Talk about money first; Patients at a private hospital in Solapur | कोरोनाची लक्षणं आहेत ?.. आधी पैशाचं बोला; सोलापुरातील खासगी रूग्णालयात रूग्णांचे हाल

कोरोनाची लक्षणं आहेत ?.. आधी पैशाचं बोला; सोलापुरातील खासगी रूग्णालयात रूग्णांचे हाल

Next
ठळक मुद्देकोरोनाच्या उपचारावरून शासकीय आणि खासगी रूग्णालयातील वाद काही रुग्णालयात एखाद्या महामारीची लक्षणे असलेला रुग्ण आला तर पहिल्यांदा त्याच्याकडे पैशाची विचारणाकाही रूग्णालयात उपचाराच्या बिलावरून रुग्णालय प्रशासनाशी वाद सुरू असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले

सोलापूर : कोरोनाच्या उपचारावरून शासकीय आणि खासगी रूग्णालयातील वाद चर्चेत आला असताना कोरोनाची लक्षणे असलेल्या सर्वसामान्य रूग्णांना मात्र सर्व रूग्णालयांमधून काहीसे विचित्र, संतापजनक अन् हतबल असलेल्या स्थितीत असंवेदनशीलता व्यक्त करणारे अनुभव येत आहेत. काही रुग्णालयात एखाद्या महामारीची लक्षणे असलेला रुग्ण आला तर पहिल्यांदा त्याच्याकडे पैशाची विचारणा केली जाते. त्यानंतर उपचाराची प्रक्रिया सुरू होते, तर काही रूग्णालयात उपचाराच्या बिलावरून रुग्णालय प्रशासनाशी वाद सुरू असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले. बहुतेक ठिकाणी आधी पैशाचं बोला? असेच विचारले जात असल्याचे निदर्शनास आले.

फुकट उपचार पाहिजे; तर सिव्हिलला जा !
अंगात ताप, सर्दी आणि बारीक खोकला असल्याने एका रेडिमेड शिलाई कामगाराने आज दुपारी कुंभारी येथील कोरोना उपचार केंद्र गाठले. ताप, सर्दी, खोकल्यासाठी कुठे उपचार सुरू आहे, असे एका नर्सला विचारल्यानंतर त्यांनी आपत्कालीन सेंटरकडे बोट दाखवले. आपत्कालीन सेंटरकडे गेल्यानंतर संबंधित शिलाई कामगाराला वेगळाच अनुभव पाहायला मिळाला. त्याने ताप, सर्दी, खोकला येत असल्याचे सांगितले. पंधरा दिवसांपासून हा त्रास होत असल्याचे सांगितल्यावर  इतके दिवस तुम्ही का गप्प बसलात. सिव्हिलला का गेला नाहीत? त्यावर तो कामगार आणखी शांत होत सिव्हिल खूप लांब आहे. मी राहायला कुंभारीला आहे. सिव्हिलमध्ये योग्य उपचार मिळत नाहीत म्हणून मी इथे आलो. मी खूप गरीब आहे. तेव्हा आरोग्यसेवक पुन्हा चिडला, इथे फुकट उपचार काहीच होत नाहीत. फुकट उपचार पाहिजे असेल तर सिव्हिलला जावा, येथे येऊ नका.

बिलासाठी भांडण
सिद्धेश्वर पेठेतील एका मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आम्ही  अंग, घसा व डोकेदुखीचा त्रास असल्याचे सांगितले. त्या डॉक्टरने लांबूनच त्यांची तपासणी करून हा नॉर्मल व सीझनेबल आजार असल्याचे सांगितले. तेथे उपस्थित असलेल्या दोन महिला मात्र बिलावरून वाद घालत होत्या. आम्हाला हे आधीच सांगायला हवे होते. आम्ही दुसºया हॉस्पिटलला गेलो असतो, असे या महिला तावातावाने म्हणत होत्या. 

तपासणीसाठी पैसे नाहीत; तर अ‍ॅडमिटचे काय ?
मंगळवेढा रोडवरील एका प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर तेथील वैद्यकीय कर्मचारी थोडे उंच स्वरातच म्हणाला, रुग्णाला कोणती लक्षणे आहेत असे विचारले़  तेव्हा रुग्णाने ताप, खोकला आहे आणि श्वास घेण्यासाठी थोडा त्रास होत असल्याचे सांगितले़  त्यावर पेशंटला अ‍ॅडमिट करावे लागेल़ त्यासाठी सध्या एक्स-रे काढून घ्यावा लागेल़  जर न्यूमोनिया झाला असेल तर सीटीस्कॅन करावे लागेल़  यासाठी एक्स-रेला ३५० रुपये खर्च येईल. तपासणी फी जवळपास चारशे ते पाचशे रुपये येईल ते वर सांगण्यात येईल़  आणि न्यूमोनिया असेल तर सीटी स्कॅन करावे लागेल यासाठी तीन हजार रुपये भरावे लागतील, असे सांगितले़  सध्या जवळ पैसे नसल्याचे सांगितल्यावर तो कर्मचारी हिणवून म्हणाला, तपासणीसाठी पैसे नाहीत; तर अ‍ॅडमिट करण्याचे दूरच आहे.

पैसे न दिल्याने तपासलेही नाही!
सोलापुरातील एका मोठ्या सहकारी हॉस्पिटलमध्ये सिव्हिलद्वारे पाठविलेल्या रूग्णाच्या उपचाराबाबत पैशाचेच वाद होत असल्याच्या तक्रारी आहेत. येथील एका रूग्णालयात सिव्हिलकडून रूग्ण आलेला असताना त्याला दाखल करून घेतले; पण चोवीस तास उलटून गेल्यानंतर त्या रूग्णाला तपासणीसाठी कोणी आले नाही. त्याचे जेवण, पाणीही विचारण्यात आले नाही. यासंदर्भात विचारणा केली असता प्रथम बिल भरा असेच सांगितले. लवकरात लवकर स्वॅब टेस्टिंग पाहिजे असल्यास ५५ हजार रूपये, असे सांगण्यात आले. त्यावेळी रूग्णाचे नातेवाईक मात्र त्रस्त झाले.

डॉक्टरांचे आॅपरेशन झालंय.. अन्यत्र जा!

  • - होटगी रोडवरील एका रुग्णालयातील प्रमुख डॉक्टरांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्यामुळे तेथे येणाºया प्रत्येक रुग्णाला उपचारासाठी अन्य रुग्णालयात पाठविले जात आहे. यासंदर्भात चौकशी केली असता अन्य दवाखान्यात जाण्याचा सल्ला देण्यात आला.
  • च्या रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) १० ते १ या वेळेत सुरू आहे. फक्त हाड आणि पोटाच्या आजारासाठी सुरू आहे. तर मेडिसिन विभाग पूर्णपणे बंद आहे. जर कोणी पेशंट आला तरी त्यांना शेजारील रुग्णालयात पाठविण्यात येत आहे. सर्दी, खोकला या आजारांवर उपचार बंद आहेत. 
  • - अनेक वर्षांपासून या डॉक्टरांकडे उपचार घेतोय, हातगुण चांगला आहे, आज तब्येत दाखविण्यासाठी आलो होतो, परंतु डॉक्टर नाहीत दुसºया दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिल्याचे एका रुग्णाने सांगितले. पावसात भिजल्यामुळे मला सर्दी झाली. त्यामुळे शिंकताना, खोकताना लोक माझ्याकडे याला कोरोना झाला आहे, अशा नजरेतून पाहू लागले. त्यामुळे सरकारी दवाखान्यात जाण्यापेक्षा खासगीमध्ये जाऊन बघू म्हणून येथे आलो होतो; पण अन्य दवाखान्यात जाण्यास सांगितल्याचे तो रुग्ण म्हणाला.

Web Title: What are the symptoms of corona? .. Talk about money first; Patients at a private hospital in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.