सोलापूर विमानतळाला अडथळा ठरणाºया सिध्देश्वर साखर कारखान्याच्या पर्यायी चिमणी उभारण्याबाबत काय झाले? जिल्हाधिकाºयांकडून सिद्धेश्वर कारखान्याला विचारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 11:19 AM2018-02-01T11:19:55+5:302018-02-01T11:22:19+5:30
चिमणीचे पाडकाम करताना दिलेल्या आश्वासनानुसार पर्यायी चिमणी उभारण्याबाबत काय उपाययोजना केल्या, याबाबतचा खुलासा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कुमठे (ता. उत्तर सोलापूर) येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : चिमणीचे पाडकाम करताना दिलेल्या आश्वासनानुसार पर्यायी चिमणी उभारण्याबाबत काय उपाययोजना केल्या, याबाबतचा खुलासा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कुमठे (ता. उत्तर सोलापूर) येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला दिले आहेत.
होटगी रोडवरील विमानतळावरून विमान उड्डाणास अडथळा ठरणारी चिमणी हटविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने कारखान्याला दिले होते. यासंदर्भात सिद्धेश्वर साखर कारखाना कामगार युनियनने दाखल केलेल्या याचिकेवर जून २०१८ मध्ये सुनावणी होणार आहे. सहा महिन्यांपूर्वी प्रशासनाकडून चिमणीच्या पाडकामाची तयारी झाल्यानंतर कारखान्याने पर्यायी चिमणी उभारण्याचे आश्वासन प्रशासनाला दिले होते. यावर प्रशासनाने पर्यायी चिमणी उभारण्याच्या कामावर आमचे लक्ष असेल. पर्यायी चिमणीची जागा विमानतळ विकास प्राधिकरणाच्या निर्देशानुसार निश्चित करावी, असे सांगितल होते. याबाबत न्यायालयीन लढाई सुरू असली तरी पर्यायी चिमणी उभारण्याचे काय झाले, याबाबत खुलासा करण्याचे पत्र सिद्धेश्वर कारखान्याला दिल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. न्यायालयाने काही निर्देश दिले असतील तर आदेश पाहूनच पुढील कार्यवाही ठरविता येईल. परंतु, तूर्तास कारखान्याला खुलासा करण्यास सांगितल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.
----------------------
करमाळा तहसीलदारांच्या चौकशीचे पत्र पाठवले
- वाळू प्रकरणात कारवाईसाठी गेल्यानंतर ट्रक जाळल्याच्या आरोपावरून करमाळ्याचे तहसीलदार संजय पवार यांच्यावर कर्जत (जि. अहमदनगर) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पवार यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. याप्रकरणी तहसीलदार पवार यांच्याबाबत शासनाकडे पत्र पाठविल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले.
------------------
खनिजच्या तक्रारी अपर जिल्हाधिकाºयांकडे करा
- मुरूम, दगड, वाळू यासह विविध प्रकारच्या खनिजांचा बेकायदेशीर उपसा होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, खनिकर्म अधिकारी यांच्याकडे नेहमीच येतात. परंतु यासंदर्भातील तक्रारी अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्याकडेच कराव्यात. अपर जिल्हाधिकाºयांकडून तक्रारींचे निवारण करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले.