शेतकºयाची वाट अडविणारे शिवाचार्य सामान्यांना काय देणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 02:23 PM2019-03-16T14:23:48+5:302019-03-16T14:29:40+5:30

लिंगायत समन्वय समितीचा भाजपच्या भावी उमेदवारांना खोचक सवाल

What will Shivchacharya do to the people who stop the wait of the farmer? | शेतकºयाची वाट अडविणारे शिवाचार्य सामान्यांना काय देणार ?

शेतकºयाची वाट अडविणारे शिवाचार्य सामान्यांना काय देणार ?

Next
ठळक मुद्देलिंगायत समन्वय समिती ही सर्वसामान्य लिंगायत बांधवांचे प्रतिनिधीत्व करते - विजयकुमार हत्तुरेधर्मगुरू हे सकल समाजाच्या कल्याणाचा विचार करतात - विजयकुमार हत्तुरेश्रीमंत माणसे गरिबांचा विचार करायला तयार नाहीत - विजयकुमार हत्तुरे

सोलापूर : भाजपाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य आणि त्यांच्या सहकाºयांनी अक्कलकोट तालुक्यातील शेतकºयांची वाट अडविल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी आमच्याकडे आली होती. या प्रकरणाची सुनावणी विभागीय आयुक्तांकडे प्रलंबित आहे. धर्मगुरु हा उदार विचारांचा असतो. शेतकºयांची वाट अडविणारे धर्मगुरू खरोखरच सर्वसामान्य शेतकºयांना न्याय देतील का, असा सवाल लिंगायत समन्वय समितीचे प्रमुख विजयकुमार हत्तुरे यांनी  केला. 

हत्तुरे म्हणाले, लिंगायत समन्वय समिती ही सर्वसामान्य लिंगायत बांधवांचे प्रतिनिधीत्व करते. डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य निवडणूक लढविणार असल्याचे कळल्यानंतर अनेक भक्तांनी आमच्याकडे नाराजी व्यक्त केली. महाराजांनी निवडणूक लढवावी की लढवू नये याबद्दल आम्ही फारसे बोलणार नाही, पण आम्ही महाराजांपुढे काही प्रश्न उपस्थित करणार आहोत. त्याची उत्तरे त्यांनी जाहीरपणे द्यायला हवीत. परवाच आमच्याकडे गौडगाव बु. येथील काही शेतकरी आले होते.

होटगी येथील कै.शरणबसप्पा पाटील यांच्याकडून महास्वामी यांनी जमीन घेतली. ही जमीन घेतल्यानंतर काही दिवसांनी धोंडव्वा पाटील, परमेश्वर पाटील, जगदेवी टाकळे, शिवरुद्रप्पा पाटील यांच्यासह सहा शेतकºयांची वाट अडविण्यात आली. त्यामुळे या सर्वांनी महास्वामींना साकडे घेतले. तिथे न्याय मिळाला नाही म्हणून तहसीलदारांकडे धाव घेतली. वहिवाटीचे प्रश्न सर्वत्र आहेत. गेल्या १७ वर्षांपासून हा वाद सुरु आहे . धर्मगुरू हे सकल समाजाच्या कल्याणाचा विचार करतात. जे श्रीमंत आहेत त्यांनी गरिबांच्या कल्याणाचा विचार केला पाहिजे, असे धर्मगुरुच सांगतात. पण इथे उलटेच घडलेले आहे. श्रीमंत माणसे गरिबांचा विचार करायला तयार नाहीत. 

शेतमाल घरी आणणे कठीण
- हत्तुरे म्हणाले, लिंगायत धर्मामध्ये ‘मानव धर्म के जय वागली’ असे घोषवाक्य आहे. पण गौडगाव येथील शेतकºयांची वाट अडविल्यामुळे त्यांना शेतमाल घरी आणणे कठीण झाले आहे. आम्ही महाराजांना विनंती करतो की तुम्ही या शेतकºयांना न्याय द्या. परमेश्वर पाटील, हणमंत पाटील, गणपती पाटील यांच्यासारखे अनेक शेतकरी तुम्हाला निश्चित दुआ देतील, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: What will Shivchacharya do to the people who stop the wait of the farmer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.