क्या बात हैं... द्राक्ष निर्यातीसाठी राज्यातील ४३ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 05:49 PM2022-01-12T17:49:19+5:302022-01-12T17:49:25+5:30

गुणवत्तापूर्व द्राक्ष निर्मितीकडे कल वाढला, युवकांच्या सहभागाने संधी

What's up ... 43,000 farmers in the state registered for grape export | क्या बात हैं... द्राक्ष निर्यातीसाठी राज्यातील ४३ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

क्या बात हैं... द्राक्ष निर्यातीसाठी राज्यातील ४३ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

Next

सोलापूर : थंडी कमी झाल्यानंतर उन्हाचा कडाका सुरू होईल व निर्यातीला चालना मिळेल, या अपेक्षेने राज्यातील ४३ हजार शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. दोन वर्षांच्या कोरोनाच्या प्रभावात युवक शेतकरीही द्राक्ष शेतीला जोडले असले तरी विक्रीसाठी देशभरात नेटवर्क तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या द्राक्ष निर्यातीला म्हणावा तितका वेग आला नसला तरी गुणवत्तेचा माल तयार करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.

महाराष्ट्रातून विशेषतः नाशिक, सांगली, पुणे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, सातारा या जिल्ह्यांत निर्यातक्षम गुणवत्तेची द्राक्षं तयार केली जातात. यामध्ये नाशिक जिल्हा आघाडीवर आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यातून ३५ हजार शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. नाशिक जिल्ह्यातील ६ हजार, पुणे जिल्ह्यातील १३००, अहमदनगर जिल्ह्यातील ९५०, सोलापूर जिल्ह्यातील ७००, उस्मानाबाद जिल्ह्यातील ६००, सातारा जिल्ह्यातील ५०० व लातूर जिल्ह्यातून १५० शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे.

कोरोनाच्या प्रभावानंतर तरुणवर्ग द्राक्ष शेतीला जोडला असल्याने निर्यातक्षम द्राक्ष तयार करण्यासाठी कल वाढला असल्याचे सांगण्यात आले. सध्याचा थंडीचा कालावधी कमी झाल्यानंतर ग्राहकांकडून द्राक्षाची मागणी वाढेल असे सांगण्यात आले. सोलापूर जिल्ह्यात मागील वर्षी ५०० तर यावर्षी ७०० शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे.

शेतकऱ्यांनी नोंदणी

  • २०१८-१९ मध्ये ३५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली; मात्र १२ हजार शेतकऱ्यांची एक लाख ९५ हजार मे. टन, १९-२० मध्ये ३८ शेतकऱ्यांची नोंदणी व दोन लाख १० हजार मे. टन, २०-२१ मध्ये ४५ हजार शेतकऱ्यांची नोंदणी व १३०० शेतकऱ्यांची दोन लाख ४६ हजार मे. टन द्राक्ष निर्यात झाली होती.
  • * देशभरात द्राक्षाला ग्राहक आहे; पण तरुण शेतकऱ्यांना द्राक्ष विक्रीसाठी ‘नेटवर्क’ तयार करण्यास पाहिजे तेवढे यश येईल. गुणवत्ता, ग्रेडिंग, पॅकिंग चांगली केली तर इतर राज्यांत मार्केटिंगची अडचण नसल्याचे जाणकारांनी सांगितले.
  • * निर्यातीतून राज्यात दरवर्षी २२०० ते २३०० कोटी रुपये मिळतात, असे निर्यात सल्लागार गोविंद हांडे यांनी सांगितले.

 

निर्यातीच्या निमित्ताने गुणवत्तेची द्राक्षं तयार होतील, निर्यात नाही झाली तरी विविध राज्यांत शेतकऱ्यांनी थेट दलाल विरहित द्राक्ष बाजार शोधला पाहिजे. किमान आधारभूत किंमत ठरविण्याचा निर्णय चांगला आहे; मात्र एकीने शेतकऱ्यांनी नेटवर्क तयार केले पाहिजे.

- गोविंद हांडे, राज्य निर्यात सल्लागार

 

Web Title: What's up ... 43,000 farmers in the state registered for grape export

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.