अवघ्या एक रुपया किलोनं कांदा विकताना शेतकऱ्यांना वाटली स्वत:च्या पेशाची लाज

By Appasaheb.patil | Published: November 20, 2018 05:14 PM2018-11-20T17:14:42+5:302018-11-20T17:18:10+5:30

क्विंटलला ६०० रूपयांचा मिळाला दर : विक्रीतून मिळणाºया रकमेपेक्षा वाहतूक खर्च अधिक

When selling only one rupee kilogram onion, the farmers felt the shame of their own profession | अवघ्या एक रुपया किलोनं कांदा विकताना शेतकऱ्यांना वाटली स्वत:च्या पेशाची लाज

अवघ्या एक रुपया किलोनं कांदा विकताना शेतकऱ्यांना वाटली स्वत:च्या पेशाची लाज

googlenewsNext
ठळक मुद्देकांदा दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुरता हतबलकांद्याला क्विंटलमागे कमीतकमी १०० रुपयांचा दर मिळालासध्या मिळणारा दर कांदा विक्रीसाठी केलेला वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकरी पुरता हतबल

अरुण बारसकर / आप्पासाहेब पाटील

सोलापूर : कांद्याची आवक फार मोठ्या प्रमाणावर होत नसतानाही कांदा दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुरता हतबल झाला आहे. सोलापूर बाजार समितीत सोमवारी कांद्याला क्विंटलमागे कमीतकमी १०० रुपयांचा दर मिळाला.

मागील आठवड्यापासून सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक बºयापैकी होऊ लागली आहे. दररोज ३०० च्या जवळपास ट्रक कांदा विक्रीसाठी येत आहे. चांगल्या कांद्यापैकी काही पोत्यांना( एक-दोन टक्के) एक हजारापेक्षा अधिक परंतु १६०० रुपयांपर्यंत दर मिळतो. मात्र अन्य सर्वच कांद्याला १०० रुपयांपासून दर मिळतो. 

बºयापैकी कांद्याला तीनशे- चारशेच दर मिळतो. सोमवारी बाजार समितीत २७० ट्रक कांदा आला होता. त्याला १०० रुपयांपासून १६०० रुपयांपर्यंत दर मिळाल्याचे बाजार समिती कांदा विभागाकडून सांगण्यात आले. मात्र विक्रीसाठी आलेल्या कांद्यापैकी काही कांद्यालाच एक हजार रुपयांपेक्षा अधिक दर  व्यापारी देतात असे सांगण्यात आले. सध्या मिळणारा दर कांदा विक्रीसाठी केलेला वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. 

सोमवारी बाजार समितीत वांगी, काटी, जवळगाव, कुंभारी, वळसंग आदी भागातून कांदा विक्रीसाठी आला होता़ कांद्याला कमी प्रमाणात भाव मिळाला आहे़ 

जास्तीचा भाव मिळेल या आशेने आम्ही कांदा विक्रीसाठी बाजार समितीत आणला होता़ मात्र चांगल्या प्रतिच्या कांद्याला सोमवारी फक्त ६०० रूपये भाव मिळाल्याने आम्ही निराश झालो़ मिळालेल्या पैशांतून उत्पादन खर्चदेखील निघाला नाही़ जर असाच भाव मिळाला तर जगायचं कसे असा प्रश्न समोर उपस्थित होत आहे़
- चंद्रकांत जवळकोटे, शेतकरी, वांगी.

मी कालच आमच्या शेतातील कांदा कापणी करून सोमवारी विक्रीसाठी सोलापूरच्या बाजार समितीत आणला़ मात्र आवक कमी असताना दर म्हणावा तसा मिळाला नाही़ उलट शेतकºयांची घोर निराशा झाली़ उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळाल्याने शेतकरी नाराज झाला आहे़ शेतकºयांना जास्तीचा भाव मिळावा यासाठी शासनाने प्रयत्न करावेत़
- अण्णाप्पा कटारे, शेतकरी, कुंभारी.

मी ५० पाकीट कांदा विक्रीसाठी आणला़ वाहतूक खर्च जास्तीचा जात आहे़ मी आणलेल्या कांद्याला सरासरी ५०० रूपये एवढा दर मिळाला़ कांदा लागवड, कापणी, खुरपणी, औषध फवारणी आदी खर्च धरला तर तो हजारो रूपयांत जातो़ अन् कांद्याला भाव मिळतो तो फक्त शेकडो रूपयांत़ काय करावं काही कळेनासे झाले आहे़ 
- सयाजी देशमुख, शेतकरी, काटी़

मी मोठ्या आशेने ३५ पाकीट कांदा विक्रीसाठी बाजारात आणला़ मी आणलेल्या १ नंबर कांद्याला ६०० रूपये, ३ नंबर कांद्याला ३०० रूपये दर मिळाला़ मला एक पाकीट कांद्यासाठी साधारणपणे २०० ते ३०० रूपये खर्च आला़ उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळाल्याने कर्जाचा बोजा वाढला़ शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त होत आहे़ 
- त्रिंबक कापसे, शेतकरी, जवळगाव. 

Web Title: When selling only one rupee kilogram onion, the farmers felt the shame of their own profession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.