मी जिथे आहे.. तिथेच समाधानी, माढ्यावर माझा दावा नाही : राजन पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 02:45 PM2019-03-16T14:45:51+5:302019-03-16T14:47:15+5:30

मोहोळ : माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा अद्याप तिडा सुटला नाही. यामुळे चर्चेला ऊत आला असून, माजी आमदार राजन ...

Where I am .. Satisfied in it, there is no claim on my soul: Rajan Patil | मी जिथे आहे.. तिथेच समाधानी, माढ्यावर माझा दावा नाही : राजन पाटील

मी जिथे आहे.. तिथेच समाधानी, माढ्यावर माझा दावा नाही : राजन पाटील

googlenewsNext
ठळक मुद्देमाढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा अद्याप तिडा सुटला नाहीपक्षाने मला भरपूर काही दिलेले आहे. मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी समाधानी आहे - राजन पाटील

मोहोळ : माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा अद्याप तिडा सुटला नाही. यामुळे चर्चेला ऊत आला असून, माजी आमदार राजन पाटील यांना उमेदवारी देण्याचाही पर्याय पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर राजन पाटील यांनी ‘मी जिथे आहे.. तिथेच समाधानी आहे. एक तर तो माझा मतदारसंघ नाही. मी त्या ठिकाणी इच्छुकही नाही आणि कधी इच्छा प्रकट केलीही नाही. त्यामुळे त्या ठिकाणी दावा करण्याचा व उभारण्याचा प्रश्न येत नाही’, असा खुलासा केला आहे.

राजन पाटील पुढे म्हणाले, पक्षाने मला भरपूर काही दिलेले आहे. मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी समाधानी आहे. पक्षाच्या माध्यमातून माढा लोकसभा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी जो उमेदवार दिला जाईल त्या उमेदवारांना सर्वसामान्य जनतेच्या विश्वासावर निवडून देण्याचे प्रामाणिकपणे काम करणार आहे. सोशल मीडियावरूनच मला पण समजलं, असेही ते म्हणाले. लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात अनगरच्या पाटील कुटुंबीयांना मानणारा वर्ग आहे.  जर त्यांना उमेदवारी मिळाली तर विरोधकसुद्धा प्रचार करतील. सध्या हा एकच पर्याय आहे.

माढ्याची उत्सुकता
शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर माढ्यात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण, याबाबत चार दिवस सोशल मीडियावरून वेगवेगळे मेसेज येत आहेत. त्यामुळे यातून उमेदवारी कोणाला मिळणार हा विषय जिल्ह्यासह राज्यात उत्सुकतेचा बनला आहे. 

Web Title: Where I am .. Satisfied in it, there is no claim on my soul: Rajan Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.