कॅप्सूल कंटेनरमधून टाक्यांमध्ये गॅस भरताना धाड, साठ लाखांच्या ऐवजासह दोघे ताब्यात

By काशिनाथ वाघमारे | Published: July 11, 2023 08:58 PM2023-07-11T20:58:16+5:302023-07-11T20:58:23+5:30

कामती पोलिसांची कारवाई : काळ्या बाजारात विक्रीला जाण्याचा संशय

While filling gas in tanks from capsule containers, two were detained along with 60 lakhs in cash | कॅप्सूल कंटेनरमधून टाक्यांमध्ये गॅस भरताना धाड, साठ लाखांच्या ऐवजासह दोघे ताब्यात

कॅप्सूल कंटेनरमधून टाक्यांमध्ये गॅस भरताना धाड, साठ लाखांच्या ऐवजासह दोघे ताब्यात

googlenewsNext

काशिनाथ वाघमारे 

सोलापूर :सोलापूर-मंगळवेढा महामार्गावर सोहाळे गावाच्या शिवारात हॉटेल शिवराज पॅलेसच्या आवारात कॅप्सूल टाकीच्या कंटेनरमधून थेट सिलेंडर टाक्यांमध्ये गॅस भरताना पोलिसांनी धाड टाकून पकडले. या कारवाईत दोघांना ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.

कामती पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुनगे आणि त्यांच्या पथकाने मंगळवार, ११ जुलै रोजी पहाटे ही कारवाई केली. आरोपींच्या ताब्यातून दोन वाहने आणि गॅस टाक्यांसह साठ लाख २६ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार एचपी कंपनीचा गॅस भरुन निघालेला कॅप्सूल आकाराचा कंटेनर (एम. एच. ४८ / ए. वाय. ४६९८) सोहाळे गावच्या शिवारात एका हॉटेलमध्ये थांबवला असून तो व्यवसायिक गॅस टाक्यांमध्ये भरला जात असल्याची माहिती मिळाली.

या कंटेनरमध्ये डीलिव्हरी चलन पावतीप्रमाणे अंदाजे १७ हजार ६४० किलो वजनाचा ८ लाख ४० हजार ३६९ रूपयांचा गॅस होता. दुसरे वाहन एका पीकअप (एम. एच. २५ / ए. जे. ५१८६) मधील टाक्यांमध्ये गॅस भरले जात होते. यावेळी पोलिसांनी धाड टाकली आणि ५६ रिकाम्या लोखंडी सिलेंडर टाक्या आणि १८ लोखंडी गॅस सिलेंडरच्या पूर्ण भरलेल्या टाक्या, इलेक्ट्रीक वजनकाटा, लोखंडी नौजल , त्याला एकूण सहा जॉईंट पाईप, एक लोखंडी अॅडजस्ट पाना असा एकूण ६० लाख २६ हजार ३६९ रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. यात सहभागी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

या ठिकाणी हॉटेल चालक तुकाराम हणमंत नाईकनवरे (वय ३५, रा. सोहाळे, ता.मोहोळ), पीकअप वाहन चालक संजय मोहन पाटील (वय ३६, रा. डोंगरगाव, ता. मंगळवेढा) आणि कंटेनर चालक हे तिघे स्फोटक, ज्वलनशील गॅस धोकादायक स्थितीत भरत असताना आढळले. हा गॅस काळ्या बाजारात जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, पोलीस नाईक भरत चौधरी, अमोल नायकोडे, सचिन निशीकांत येळे, हरीदास चौधरी, प्रथमेश खैरे यांनी कारवाईत सहभाग नोंदवला.

Web Title: While filling gas in tanks from capsule containers, two were detained along with 60 lakhs in cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.