१५ हजाराची लाच घेताना बार्शीच्या सहकार अधिकाºयास रंगेहाथ पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 07:46 PM2018-04-05T19:46:51+5:302018-04-05T19:59:02+5:30

तक्रारदार हे खासगी सावकारी व्यवसाय करतात़ त्यांचा सावकारी परवाना सन २०१८-१९ साठी नुतनीकरण करण्यासाठीचा प्रस्ताव सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, बार्शी यांच्या कार्यालयात सादर केला होता़

While taking a bribe of 15 thousand, Barshi's Assistant Registrar was caught in the dock | १५ हजाराची लाच घेताना बार्शीच्या सहकार अधिकाºयास रंगेहाथ पकडले

१५ हजाराची लाच घेताना बार्शीच्या सहकार अधिकाºयास रंगेहाथ पकडले

googlenewsNext
ठळक मुद्देबार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरूसावकारी परवाना नुतनीकरणासाठी मागितली होती लाच

सोलापूर : सावकारी परवाना नुतनीकरण करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे पाठविण्यासाठी १५ हजार रूपयाची लाच खासगी इसमामार्फत स्वीकारताना बार्शीचे सहकार अधिकाºयास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले़ याप्रकरणी दोघांविरूध्द बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़ 

गोविंद किसनराव कळसकर (वय ४८ सहकार अधिकारी, श्रेणी २ सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, कार्यालय बार्शी रा़ आडवा रस्ता, बार्शी ) व खासगी इसम बाबासाहेब दिगंबर जाधव (वय ४२ रा़ उपळाई रोड, बार्शी) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत़

तक्रारदार हे खासगी सावकारी व्यवसाय करतात़ त्यांचा सावकारी परवाना सन २०१८-१९ साठी नुतनीकरण करण्यासाठीचा प्रस्ताव सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, बार्शी यांच्या कार्यालयात सादर केला होता़ प्रस्तावाची तपासणी करून मंजूरीस जिल्हा उपनिबंधकाकडे पाठविण्यासाठी सहा़ निबंधक कळसकर यांनी तक्रारदाराकडे १५ हजार रूपये लाचेची मागणी केली होती़ ही १५ हजार रूपयाची लाच खासगी इसमामार्फत स्वीकारताना सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़ याप्रकरणी बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़

Web Title: While taking a bribe of 15 thousand, Barshi's Assistant Registrar was caught in the dock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.