लाच घेताना बांधकाम विभागाच्या अभियंत्यास रंगेहाथ पकडले
By admin | Published: April 26, 2017 04:46 PM2017-04-26T16:46:11+5:302017-04-26T16:46:11+5:30
.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २६ : पूर्ण केलेल्या बांधकामाचे अंतिम बिल मंजूर करण्यासाठी ३ हजार रूपयांची लाच स्वीकारताना मंगळवेढा जि़प़ बांधकाम विभाग २ येथील उपविभागीय अभियंता रामचंद्रा महादेव पांढरमिसे (वय ५६) यास सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़
दरम्यान, तक्रारदार यांनी शिरनांदगी (ता़ मंगळवेढा) येथील आमदार फंडातील सभामंडपाचे बांधकाम केले आहे़ सदर कामाचे अंतिम बिल ४ लाख ९९ हजार ६४४ एवढे मंजूर करण्यासाठी बांधकाम उपविभागीय अभियंता यांनी तक्रारदाराकडे ४ हजार रूपये लाचेची मागणी केली होती़ तडजोडीअंती ३ हजार रूपयांची लाच स्वीकारताना सोलापूर लाचचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले़
ही कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक अरूण देवकर, पोलीस निरीक्षक सिद यांच्या पथकाने केली़