सोलापूरात लाच घेताना दोघांना रंगेहाथ पकडले
By Admin | Published: April 5, 2017 04:26 PM2017-04-05T16:26:24+5:302017-04-05T16:26:24+5:30
.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ५ : वडिलांना मंजूर झालेल्या घरकुलाचा तिसरा हफ्ता काढण्यासाठी ३ हजार रूपयांची लाच स्वीकारताना दोघांस रंगेहाथ पकडले़ मल्लिकार्जुन मनुरे व गजेंद्र अर्जुन अशी दोघांची नावे आहेत़ मनुरे हे सोलापूर जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात स्थापत्य अभियांत्रिकी या पदावर कार्यरत आहेत़
दरम्यान, तक्रारदार यांच्या वडीलांच्या नावे घरकुल मंजूर झाले होते़ त्याप्रमाणे घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर घराचा तिसरा हफ्ता मिळण्यासाठी घरकुल पूर्णत्वाचा अहवाल देण्यासाठी जिल्हा परिषद सोलापूर येथील बांधकाम विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी मल्लिकार्जुन आण्णासाहेब मनुरे यांनी तक्राददाराकडे ५ हजार रूपये लाचेची मागणी केली होती़ या मागणीची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा परिषद सोलापूरच्या बांधकाम विभागात सापळा लावला़ यावेळी मल्लिकार्जुन मनुरे यांच्या सांगण्यावरून गजेंद्र बाबुराव अर्जुन (वय ६५, रा़ २५६ रविवार पेठ, सोलापूर) यास तडजोडीअंती ३ हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले़
याप्रकरणी मल्लिकार्जुन मनुरे व गजेंद्र अर्जुन यांच्याविरूध्द सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे़ ही कारवाई पोलीस निरीक्षक व्ही़बी़सिद यांच्या पथकाने केली आहे़