माती भरलेला टिपर पोलीस ठाण्याला नेताना धक्काबुक्की करुन चालक झाला पसार

By विलास जळकोटकर | Published: December 8, 2023 05:51 PM2023-12-08T17:51:33+5:302023-12-08T17:51:46+5:30

मंडल अधिकाऱ्याची फिर्याद: सरकारी कामात अडथळा, तिघांविरुद्ध गुन्हा

While taking the soil-laden tipper to the police station, the driver died after being jostled | माती भरलेला टिपर पोलीस ठाण्याला नेताना धक्काबुक्की करुन चालक झाला पसार

माती भरलेला टिपर पोलीस ठाण्याला नेताना धक्काबुक्की करुन चालक झाला पसार

सोलापूर : बेकायदेशीररित्या माती वाहतूक करणाऱ्या टिपरवर कारवाईसाठी ते वाहन पोलीस ठाण्याकडे नेताना मंडल अधिकाऱ्याला धक्काबुक्की करुन टिपरसह चालक पसार झाला. जुळे सोलापुरातील डीमार्ट कॉर्नरवर दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी मंडल अधिकारी रत्नाकर अर्जुन कांबळे (वय- ३८, रा. बी. ५०, जुळे सोलापूर) यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

यातील फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी हे महसूल विभागात मंडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. दुपारी १:१५ च्या सुमारास ते दैनंदिन कामकाजात असताना डी मार्ट कॉर्नर, जुळे सोलापूर परिसरात एक मातीनं भरलेला टिपर (एम. एच. १३ एक्स ९४७७) बेकायदेशीर वाहतूक करीत असताना दिसून आला. फिर्यादीने त्याला अडवून पोलीस ठाण्याकडे कारवाईसाठी घेऊन जात असताना गाडीचे मालक दत्तात्रय भरले यांनी विरोध करुन फिर्यादीला धक्काबुक्की केली. तोपर्यंत चालकाने टिपरसह गुंगारा दिला.

या प्रकरणी शासनास मिळणारा महसूल बुडवण्यासाठी हे कृत्य केल्याबद्दल टिपर मालक, चालक व अन्य एक अशा तिघांविरुद्ध अनधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रतिबंध अन्वये सरकारी कामकाजात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पुढील तपास फौजदार गायकवाड करीत आहेत.

Web Title: While taking the soil-laden tipper to the police station, the driver died after being jostled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.