उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी बोलतानाच वृद्ध व्यक्तीला आली चक्कर, मग..
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 03:16 PM2023-05-25T15:16:23+5:302023-05-25T15:16:51+5:30
सामाजिक कार्यकर्ते विलास शाह हे कामानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी आले होते.
सोलापूर - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असून याठिकाणी नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमावेळी अनेक लोक उपमुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी उपस्थित होते. त्याठिकाणी एक वृद्ध व्यक्तीही हातात निवेदन घेऊन उभे होते. देवेंद्र फडणवीस यांनी या वृद्धाची समस्या उभे राहून जाणून घेतली परंतु बोलता बोलता वृद्ध व्यक्तीला भोवळ आल्याने ते खाली पडले.
सामाजिक कार्यकर्ते विलास शाह हे कामानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी विलास शाह यांना चक्कर आली. वाढलेल्या उष्णतेमुळे शाह यांना चक्कर आल्याचे कळते. सोलापुरातील प्राणी मित्र असलेले विलास शाह यांनी मुळेगाव तांडा रोडवरील सोनाई कत्तलखाना बंद करावी यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले. आश्वासन पूर्ण न केल्यास 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकार्यालयासमोर आत्मदहाचा इशारा दिला.