'वाटेतला काटा' काढायला गेला, पण...; प्रेयसीच्या पतीला तलावात फेकताना प्रियकरही बुडाला! बार्शीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 12:22 IST2025-02-26T12:21:44+5:302025-02-26T12:22:23+5:30

त्या दोघांचा मृत्यू संशयास्पद होतो. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

While the lover was pushing the husband into the lake due to an immoral relationship, the other also fell in, both died | 'वाटेतला काटा' काढायला गेला, पण...; प्रेयसीच्या पतीला तलावात फेकताना प्रियकरही बुडाला! बार्शीतील घटना

'वाटेतला काटा' काढायला गेला, पण...; प्रेयसीच्या पतीला तलावात फेकताना प्रियकरही बुडाला! बार्शीतील घटना

कुसळंब : ढाळे पिंपळगाव तलावातील दोघांच्या मृत्यू प्रकरणातील सत्यता पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. प्रेयसीच्या पतीला उचलून तलावात फेकताना त्याने त्याचा गळा धरला आणि प्रियकरही पाण्यात बुडून मरण पावल्याची कबुली साक्षीदाराने पोलिसांना दिली आहे.

याप्रकरणी पांगरी पोलिसांनी मयत गणेश अनिल सपाटे (वय २६, रा. अलीपूर रोड, बार्शी) आणि रूपाली शंकर पटाडे (वय ३५) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच महिलेला अटक केली आहे. महागाव (ता. बार्शी) येथील ढाळे पिपळगाव तलावात पुलावरून पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना पुढे आली होती. त्या दोघांचा मृत्यू संशयास्पद होतो. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

१९ फेब्रुवारी रोजी पांगरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली होती. तपासादरम्यान, साक्षीदार गणेश खरात याने काही महत्त्वाच्या बाबींचा खुलासा केला. गणेश सपाटे व साक्षीदार गणेश खरात हे मित्र होते. सपाटे याने या मित्रापुढे नातेवाइकाच्या पत्नीसोबत संबंध असल्याचे सांगून तिचा नवरा अडथळा ठरत असल्याचे स्पष्ट केले होते. त्याला ठार मारण्याची इच्छा त्याने व्यक्त केली होती. 

१७फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता गणेश सपाटे, त्याचा मित्र गणेश खरात आणि शंकर पटाडे हे तिघे मिळून दारू पार्टीसाठी बार्शी तुळजापूर रोडवरून बावीच्या पुढे गेले. रात्रीच्या वेळी तिघेजण महागावच्या पुलाजवळ पोहोचले. दोघेजण पुलावर गप्पा मारत उभे होते.

Web Title: While the lover was pushing the husband into the lake due to an immoral relationship, the other also fell in, both died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.