कोरेगाव-भिमा येथे भीमसैनिकांवर सुरुवातीला दगडफेक कोणी केली यांची चौकशी करा ? हर्षवर्धन पाटील यांचा मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 12:53 PM2018-01-08T12:53:58+5:302018-01-08T14:28:36+5:30
कोरेगाव-भीमा येथे एक जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला सलामी देण्यासाठी आलेल्या भीमसैनिकांवर दगडफेक करणारे कोण होते? भीमसैनिकांवर सुरुवातीला कोणी दगडफेक केली? याची चौकशी सरकारने करावी, असे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्तकेले.
पंढरपूर- कोरेगाव-भीमा येथे एक जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला सलामी देण्यासाठी आलेल्या भीमसैनिकांवर दगडफेक करणारे कोण होते? भीमसैनिकांवर सुरुवातीला कोणी दगडफेक केली? याची चौकशी सरकारने करावी, असे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
पंढरपूर येथे खासगी कामानिमित्त आल्यानंतर माजी मंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, डॉ. सुधीर शिनगारे उपस्थित होते. भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रात आजपर्यंत सामाजिक ताणतणाव, वाद निर्माण झाले आहेत. सरकारकडून समाजातील सर्व घटकांवर अन्याय होत आहे.
कोरेगाव-भीमा येथे सुरुवातीला कोणी दगडफेक केली? का केली? या प्रश्नांची उत्तरे सरकारने शोधायला हवीत़ प्रकाश आंबेडकर यांनी ज्यांची नावे घेतली, त्यांची चौकशी व्हावी, असे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
-------------------
खड्डे बुजवायला पैसे नाहीत ते राज्य काय चालविणार ?
- ज्या सरकारला साधा रस्त्यावर पडलेला खड्डा बुजवता येत नाही, जर खड्डा बुजवलाच तर त्याचे पैसे देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत, त्यांनी काय राज्याचा विकास केला? समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करुन, लोकांच्या भावना भडकावून किती दिवस राज्य चालविणार, असा टोला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपा सरकारला लगावला आहे.