शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढण्याचा अधिकार कुणी दिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:16 AM2021-06-18T04:16:18+5:302021-06-18T04:16:18+5:30
म्हैसगाव येथील विठ्ठल काॅर्पोरेशन लि. या खाजगी कारखान्याने शेतकऱ्याला मोफत खते देतो, असे सांगून आधार कार्ड व इतर ...
म्हैसगाव येथील विठ्ठल काॅर्पोरेशन लि. या खाजगी कारखान्याने शेतकऱ्याला मोफत खते देतो, असे सांगून आधार कार्ड व इतर कागदपत्रे जमा केली व त्यावर पंजाब नॅशनल बँकेच्या पुणे येथील शाखेतून २२ कोटी रुपये कर्ज काढले. याप्रकरणी शेतकरी आंदोलन करत असतानाच आता युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सोलापूर यांच्याकडूनही करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नावावर नोटीस आली असल्याचा दावा माजी आमदार नारायण पाटील यांनी केला आहे.
जिल्हाधिकारी सोलापूर जिल्ह्यातील सर्व बँकांचे मुख्य समन्वयक असल्याने त्यांच्या अधिकाराखाली सर्व बँक शाखा प्रमुखांची बैठक घेतली जावी व अशा आणि यासह इतर बोगस कर्ज प्रकरणांचा तपशील जमा केला जावा, ही मागणी आपण करणार आहोत. बँकांनी शेतकऱ्यांना व्याजासह थकीत कर्ज फेडण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली आहे. सदर कर्ज रक्कम व्याजासह विठ्ठल काॅर्पोरेशनकडून वसूल केली जावी आणि कारखान्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.