जिल्हा बँक कोणी अडचणीत आणली?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:22 AM2021-04-10T04:22:36+5:302021-04-10T04:22:36+5:30
महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारसभा कासेगाव, नंदेश्वर आदी भागात झाल्या. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय ...
महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारसभा कासेगाव, नंदेश्वर आदी भागात झाल्या. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आ. संजय शिंदे, सुरेश घुले, उमेश पाटील, कल्याणराव काळे, दीपक साळुंखे, उत्तम जानकर, भगीरथ भालके आदी उपस्थित होते.
यावेळी अजित पवार म्हणाले की, आम्ही आमच्या भागातील सहकारी संस्था चांगल्या चालविल्या आहेत. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. इथं मात्र वेगळे आहे. मोठ्यांची मुलं काहीतरी करतील म्हणून आम्ही त्यांना आमदार, खासदार केलं. त्यांच्या ताब्यात जिल्हा बँकेसह इतर संस्था दिल्या. मात्र त्या चुकीच्या पद्धतीने चालवून अडचणीत आणल्या. त्यांचा स्वतःचा शंकर कारखाना चालवता येत नाही, त्याचे वाटोळे केलं आणि इथं मत मागायला येतात, आशी टीका आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यावर केली.
जे बारामतीत निवडणुकीला आले त्यांचं डिपॉझिट त्यांना राखता आले नाही. ते इथं येऊन मोठमोठ्या गप्पा मारतात, अशी टीका गोपीचंद पडळकर यांच्यावर केली. दुसरा एक मोठा नेता इथं प्रचाराला आला ते अनेक वर्षे मंत्री, आमदार असूनही त्यांचा दत्तात्रय भरणेंनी सलग दोनवेळा पराभव केला. त्यांना समजलंही नाही. त्यांनी तिथं कामं केली असती तर त्यांना तेथील जनतेने नाकारले असते का? असे म्हणत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका केली. तरीही ते इथं येऊन कोणत्या तोंडाने मत मागतात, असा प्रश्न अजित पवार यांनी केला.