सोलापूर जिल्ह्यातील बाजार समितीसाठी नेमके मतदार कोण ? निवडणूक प्रक्रियेत पेच, निवडणूक कार्यालयाचे प्राधिकरणाला पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 02:15 PM2018-01-22T14:15:57+5:302018-01-22T14:16:53+5:30
नव्या सहकार कायद्यानुसार ज्याच्या नावावर सातबारा तो सोसायटीचा सभासद व बाजार समितीचा मतदार अशी घोषणा झाली असली तरी एका सातबारा उताºयावर असणाी अनेक नावे किंवा अनेक सातबारा उताºयावर असणारी एकाचे नाव यापैकी नेमकी मतदार कोण अन् मतदारांची यादी कशी अंतिम करायची याबाबत निवडणूक यंत्रणा पेचात पडली
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २२ : नव्या सहकार कायद्यानुसार ज्याच्या नावावर सातबारा तो सोसायटीचा सभासद व बाजार समितीचा मतदार अशी घोषणा झाली असली तरी एका सातबारा उताºयावर असणाी अनेक नावे किंवा अनेक सातबारा उताºयावर असणारी एकाचे नाव यापैकी नेमकी मतदार कोण अन् मतदारांची यादी कशी अंतिम करायची याबाबत निवडणूक यंत्रणा पेचात पडली असून त्यांनी याबाबत निवडणूक प्राधिकरणाला पत्र पाठवून निश्चित अशी मार्गदर्शक तत्वे मागवली आहेत.
बाजार समितीच्या निवडणुकीत १० गुंठ्यावरील शेतजमीन असलेल्या शेतकºयांना मतदानाचा अधिकार दिल्याचे सांगत असले तरी मतदार यादी नेमकी करायची कशी? यासह अनेक प्रश्न जिल्हा निवडणूक कार्यालयासह बाजार समिती यंत्रणेच्या मनात घोळत आहेत. यावरून मतदार यादीत अनेक घोळ निर्माण होण्याची शक्यता आहे. हा घोळ सोडविण्यासाठी निवडणूक कार्यालयाने सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून मार्गदर्शन मागवले आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीत यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य आणि विविध कार्यकारी सोसायट्यांच्या संचालकांना मतदानाचे अधिकार होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या पुढाकारातून आता १० आर हून अधिक शेतजमीन असलेल्या शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. परंतु, संयुक्त खातेदारांची नावे मतदार यादीत घेण्यासाठी कोणते निकष लावायचे.
----------------------------------
आधार आणि मतदान ओळखपत्र महत्त्वाचे
- ७/१२ आणि ८ अ उताºयावरून मतदारांची नावे निश्चित केली जाणार आहेत. अनेक उताºयांवर १८ वर्षे वयाखालील मुलांची नावे आहेत. मतदार यादीत या मुलांच्या नावांचा समावेश झाल्यास या नावांवर आक्षेप घेता येईल, परंतु आक्षेप घेतलाच नाही तर या मुलांकडूनही मतदान होउ शकते. हे रोखण्यासाठी आधार आणि मतदान ओळखपत्र महत्त्वाचे ठरणार आहे. यासंदर्भातही लोकसभा, विधानसभा किंवा स्थानिक स्वराज संस्थांची निवडणूक प्रक्रिया ही निवडणूक आयोगाकडून केली जाते. या निवडणुकीबाबत निर्माण होणाºया प्रश्नांबाबत निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागत असतो.
-------------------------
बाजार समितीची निवडणूक प्रथमच वेगळ््या पध्दतीने होत आहे. त्यामुळे अनेक प्रश्न समोर येत आहेत. त्याची माहिती सहकार प्राधिकरणाकडून घेत आहोत. मतदार यादीबद्दलही अनेक प्रश्न आहेत. त्याचे स्पष्टीकरण आम्ही प्राधिकरणाकडून मागवले आहे.
एस.व्ही. धुमाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर.