गुंज रहा है सारा देश...शाहीन तेरे नारो से...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 11:39 AM2020-02-05T11:39:17+5:302020-02-05T11:44:19+5:30
बेमुदत आंदोलन सुरूच; नागरिकत्व कायद्याला सोलापुरातील मुस्लिम महिलांचा तीव्र विरोध
सोलापूर : इन्कलाब बोल राहा हैं...शाहीन तेरे नारो से...बच्चा बच्चा बोल रहा है...शाहीन तेरे नारो से...हिंदुस्तान बोल रहा है...शाहीन तेरे नारो से़़ग़ुंज रहा हैं सारा देश...शाहीन तेरे नारो...हमें आझादी चाहिए एनआरसी और सीएए से अशा घोषणांनी पूनम गेटचा परिसरातील सोलापूरकरांचे लक्ष वेधले़ बुधवारी सकाळी मुस्लिम महिला या सीएए अन् संभाव्य एनआरसी कायद्याला चांगलाच विरोध दर्शवित कडाडून विरोध केला.
सकाळी लवकरच आंदोलनकर्त्या महिलांचे पूनम गेटवर आगमन झाले. अर्ध्यातासातच गर्दी वाढली. विशेष म्हणजे शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थींनीनी मोठी गर्दी केली होती़ एवढेच नव्हे तर सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील महिलांनी देखील या आंदोलनात सहभाग नोंदविल्याचे बुधवारी दिसून आले़ लहान मुलेही आपल्या आईसह आंदोलनस्थळी आले होते.
महागाईने कंबरडे मोडले आहे, घर कसे जगवायचे, मुलांना मोठे कसे करायचे, आजच्या जेवणाचे भागले, उद्या काय हा प्रश्न सतत आमच्यासमोर असतो. यात आता कागदपत्रे सादर करा, असा नवा आदेश सरकार काढत आहे. आता संवैधानिक मार्गाने आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे सांगत भाजप सरकारच्या या नागरिकत्व कायद्याचा निषेध केला.
कृती समिती स्थापन
- नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी सोलापुरात मागील तीन दिवसांपासून संविधान के सन्मान में, बहुजन महिला मैदान में या बॅनरखाली बेमुदत आंदोलन सुरू आहे़ आंदोलनाची सलगता कायम राखण्यासाठी मंगळवारी सायंकाळी संविधान बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली़ या समितीच्या नेतृत्वाखाली आता यापुढेही बेमुदत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे समितीचे फारूख शेख यांनी सांगितले़