राजकारण्यांनो व्यापाºयांचा पुळका कशासाठी ? गाळे ई निविदा समर्थनार्थ महापालिका कर्मचाºयांची एकजुट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 01:04 PM2018-07-11T13:04:33+5:302018-07-11T13:05:25+5:30
सोलापूर : महापालिकेच्या भाडेकरार मुदत संपलेल्या मेजर गाळ्यांचे ई निविदा पध्दतीने भाडे ठरविण्याच्या आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या प्रस्तावाला व्यापाºयांबरोबर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सोलापूर महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी एकवटले, राजकारण्यांनो तुम्हाला व्यापाºयांचा पुळका कशासाठी असा सवाल उपस्थित केल्याने वातावरण गरम झाले आहे़
ई निविदेच्या समर्थनार्थ महानगरपालिका कामगार संघटना कृती समितीच्यावतीने आंदोलनाची हाक देण्यात आली होती़ बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास संघटनेचे अध्यक्ष अशोक जानराव, संघटक अजय क्षीरसागर, सरचिटणीस प्रदीप जोशी, मार्गदर्शक जर्नाधन शिंदे, कार्यकारणी सदस्य तेजस्विनी कासार यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी प्रशासकीय इमारतीसमोर जमले़ सर्वांनी आयुक्त साहेब आप आगे बढो़़़हम तुम्हारे साथ हैं अशा घोषणा देऊन महापालिकेचा परिसर दणाणून सोडला़
यावेळी आयोजित सभेत संघटनेचे अध्यक्ष अशोक जानराव यांनी नगरसेवकांच्या भूमिकेवर कडाडून हल्ला केला़ आम्ही महापालिकेत कामगारांच्या बाजुने भूमिका मांडली आयुक्तांच्या भूमिकेमुळे महापालिकेचे उत्पन्न वाढणार आहे़ यामुळे शहराची विकासकामे, ठेकेदारांची देणी, कर्मचाºयांचा थकीत पगार देता येणार आहे़ असे असताना विकासकामांसाठी निधी द्या म्हणून आयुक्तांच्या मागे तगादा लावणाºया मुठभर नगरसेवकांनी व्यापाºयांचा पुळका आणून विरोधी भूमिका घेतली आहे़ हे पुढारी जन्मले नव्हते तेव्हापासून त्यांच्या आई - वडीलांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काम केले आहे़ आयुक्तांच्या उत्पन्न वाढीच्या भूमिकेसाठी आम्ही पाठींबा देत आहोत़ व्यापाºयांचे लाड करणाºया नगरसेवकांनी कर्मचाºयांचा पगार झाला नाही याबाबत सभेत आवाज उठविला का असा सवाल उपस्थित केला़
यावेळी जनार्धन शिंदे, तेजस्विनी कासार, दिपक दोड्यानूर, प्रदीप जोशी, अजय क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात आयुक्तांच्या भूमिकेचे समर्थन केले़ गाळे प्रकरणी गुडेवार यांच्यासारखी स्थिती होणार नाही आम्ही आयुक्तांच्या बाजुने आहोत अशी त्यांनी भूमिका मांडली़ ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष भोसले, छावा संघटनेचे योगेश पवार यांनीही या आंदोलनाला पाठींबा दर्शविला़