पत्नीच्या मामेबहिणीवर जडला जीव, घटस्फोट मागत नवऱ्याकडून बायकोचा छळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 11:35 AM2022-04-11T11:35:44+5:302022-04-11T11:36:43+5:30

फिर्यादी महिलेचा विवाह ५ जुलै २०१२ मध्ये माढा तालुक्यातील एका मुलाशी झाला

Wife persecuted for seeking divorce in order to maintain love affair with cousin's daughter | पत्नीच्या मामेबहिणीवर जडला जीव, घटस्फोट मागत नवऱ्याकडून बायकोचा छळ

पत्नीच्या मामेबहिणीवर जडला जीव, घटस्फोट मागत नवऱ्याकडून बायकोचा छळ

Next

सोलापूर/करमाळा : पत्नीच्या मामाच्या मुलीशी प्रेमसंबंध निर्माण करून तिच्या सांगण्यावरून मारहाण करत शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी माढा तालुक्यातील अकोले बु. येथील चौघांविरुद्ध करमाळा पोलिसांत गुरुवारी (ता. ७) गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींमध्ये पतीसह सासू, दीर व संबंधित फिर्यादीच्या मामाच्या मुलीचा समावेश आहे. याप्रकरणी करमाळा शहरातील कृष्णाजी नगर येथील ३० वर्षांच्या एका महिलेने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिलेचा विवाह ५ जुलै २०१२ मध्ये माढा तालुक्यातील एका मुलाशी झाला. त्याने लग्नानंतर सहा महिने कसेबसे नांदविले. त्यानंतर पती, सासू व दीर यांनी माहेरी जायचे नाही म्हणून फिर्यादी महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण सुरू केली. ‘बुलेट घ्यायची आहे, वडिलांकडून घेऊन दे, सोन्याचे ब्रासलेट घेऊन दे,’ म्हणून मारहाण करून उपाशीपोटी ठेवले. तेव्हा फिर्यादीच्या मामाची मुलगी शिक्षणासाठी करमाळा येथे होती. त्यावेळी फिर्यादीचा पती व ती मुलगी यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. तेव्हापासून पती फिर्यादी पत्नीला त्रास देऊ लागला.

आरोपी पती फिर्यादीला म्हणायचा, मी ‘तिच्या’सोबत लग्न केले आहे. मला सोडचिठ्ठी दे. त्या मुलीच्या सांगण्यावरून वारंवार मारहाण करून शिवीगाळी करून जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी महिला २०१६ पासून माहेरी आली. २०१२ मध्ये विवाह झाल्यापासून आतापर्यंत पती, सासू, दीर आणि मामाची मुलगी यांनी छळ केला आहे. यामध्ये चौघांविरुद्ध करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

---

Web Title: Wife persecuted for seeking divorce in order to maintain love affair with cousin's daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.