आयुक्त गुडेवार परत येणार का?
By admin | Published: May 6, 2014 10:40 PM2014-05-06T22:40:43+5:302014-05-06T23:45:58+5:30
सर्वस्तरातून होतेय गुडेवारांचे समर्थन
सर्वस्तरातून होतेय गुडेवारांचे समर्थन
सोलापूर: दोन दिवसांपूर्वी मनपा आयुक्ताचा पदभार सोडून गेलेले मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार हे पुन्हा महापालिका सेवेत येणार का, त्यांच्याबद्दल शासनस्तरावर कोणता निर्णय होणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे़ मंगळवारी दिवसभर शहरात विविध ठिकाणी गुडेवारांच्या समर्थनार्थ आंदोलने करण्यात आली़
माकप, बसपा आणि डाव्या आघाडीने मंगळवारी सायंकाळी मनपासमोर निदर्शने केली तर मनपा कर्मचार्यांनी सकाळी आंदोलन केले़ गुडेवार यांनी शासनाकडे बदलीची मागणी करुन आपला पदभार सहायक आयुक्त पंकज जावळे यांच्याकडे सोपविला आहे़ त्यामुळे शासन पातळीवर काय निर्णय होणार याकडे शहराचे लक्ष लागले आहे़ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या देखील काही सदस्यांचा छुपा पाठिंबा गुडेवारांच्या पाठीशी आहे़ विशेष म्हणजे काल केलेल्या आंदोलनात राष्ट्रवादीचे पाच सदस्य सहभागी झाले होते़ या दोन्ही पक्षात फूट पडली आहे़
गुडेवारांच्या विरोधी आंदोलनकर्त्यांमध्ये आ़ प्रणिती शिंदे आणि कोठे गटाचे नगरसेवक होते. मात्र आ़ दिलीप माने गटाच्या नगरसेवकांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली़ गुडेवारांमुळे आमच्या प्रभागात मोठा निधी मिळाला, कामेही होऊ लागली आहेत. त्यामुळे काँग्रेसचे अनेक नगरसेवक गुडेवारांच्या पाठीशी छुप्या पद्धतीने आहेत़
चौकट़़़
कर्मचार्यांचे आंदोलन
महापालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने गुडेवार यांच्या समर्थनार्थ मंगळवारी सकाळी ११ वाजता एक तास आंदोलन केले़ बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय कर्मचारी संघटनेने घेतला होता. एक तास आंदोलन केल्यानंतर जनतेला वेठीस धरु नका असे आयुक्त गुडेवार यांनी सांगितल्यामुळे मनपा कर्मचार्यांनी आपले काम सुरू केले़ आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे कामगार नेते अशोक जानराव यांनी सांगितले़
चौकट़़़
सोलापूर बचाव
कोणत्याही राजकीय पक्षाशिवाय काही उद्योजक, व्यापारी व शहर प्रेमी नागरिक एकत्र आले असून त्यांनी गुडेवारांच्या समर्थनार्थ बुधवारी सायंकाळी पाच वाजता चार पुतळा येथे निदर्शने आणि आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे़ शहरात सांची मोहीम राबविणे, गुडेवारांची बदली करु नये यासाठी शासनाला पत्रे पाठविणे आदी मोहिमा राबविण्याचे ठरविले आहे़ तिसरी आँख ुमन राईट्स संघटनेचे विजयकुमार डिग्गे यांनी तसेच ई सोलापूर डॉट कॉमचे सादिक दारुवाला यांनी देखील शासनाकडे गुडेवारांची बदली करु नये, अशी मागणी केली आहे़