Uddhav Thackeray: मंदिर समितीकडून उद्धव ठाकरेंना निमंत्रण, आषाढीसाठी मुख्यमंत्र्यांना बोलवण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 12:52 PM2022-06-27T12:52:53+5:302022-06-27T18:40:34+5:30

आषाढी एकादशी विठ्ठलाची शासकीय महापूजा : आषाढीच्या तोंडावर राजकीय भूकंप

Will Fadnavis get the opportunity he missed in 2018 or will Uddhav Thackeray take the steering wheel again? | Uddhav Thackeray: मंदिर समितीकडून उद्धव ठाकरेंना निमंत्रण, आषाढीसाठी मुख्यमंत्र्यांना बोलवण

Uddhav Thackeray: मंदिर समितीकडून उद्धव ठाकरेंना निमंत्रण, आषाढीसाठी मुख्यमंत्र्यांना बोलवण

googlenewsNext

विठ्ठल खेळगी

सोलापूर : राज्यातील राजकीय भूकंप पाहता आषाढी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा कोणाच्या हस्ते होणार, याबाबत सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. सन २०१८ साली मराठा समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे देवेंद्र फडणवीस यांची संधी हुकली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संधी मिळाली. कोरोना काळात ठाकरे यांनी स्वत: मुंबईपासून पंढरपूरपर्यंत आठ तास ड्रायव्हिंग करीत पूजेला उपस्थिती लावली. यंदाही पूजेला ठाकरेच स्टेअरिंग हातामध्ये घेणार की देवेंद्रांना हुकलेली संधी पुन्हा मिळणार, याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. आषाढीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा करण्याची परंपरा आहे. ही परंपरा एक-दोन अपवाद वगळता अखंडपणे सुरू आहे. आतापर्यंत १८ मुख्यमंत्र्यांना महापूजा करण्याची संधी मिळालेली आहे. मागील वर्षी दोन वर्षात कोरोना महामारीमुळे आषाढीच्या महापूजेला मुख्यमंत्री येणार की नाही, असा पेचप्रसंग उभारला होता. मात्र, अशातही ही परंपरा खंडित झालेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: पंढरपूरपर्यंत गाडी चालवत पूजेला उपस्थिती लावली.

यंदा आषाढी एकादशी १० जुलैला आहे. आषाढीच्या तोंडावर राज्यात राजकीय भूकंप पाहायला मिळत आहे. तत्पूर्वीच मागील आठवड्यात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यात आली आणि पूजेचे निमंत्रणही देण्यात आले आहे. त्यानंतर आता दिवसागणिक राज्यातील राजकीय वातावरण बदलत आहे. कोणत्या क्षणाला सरकार कोसळेल, याचा अंदाज येईना. त्यात आषाढी यात्रा १४ दिवसांवर येऊन ठेवली आहे. सरकार स्थिर राहिल्यास पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना महापूजेची संधी मिळणार आहे. तत्पूर्वीच जर नवीन सरकार येऊन मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यास त्यांना २०१८ साली हुकलेली संधी मिळणार आहे.

आतापर्यंत १८ मुख्यमंत्र्यांना महापूजेची संधी

यशवंतराव चव्हाण, मारोतराव कण्णमवार, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, ए.आर. अंतुले, बाबासाहेब भोसले, शिवाजीराव निलंगेकर, मनोहर जोशी, नारायण राणे, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडवणीस, उद्धव ठाकरे.

दोनवेळा महापूजेला विरोध

आतापर्यंत दोनवेळा महापूजेला विरोध झालेला आहे. १९७१ साली तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांना महापूजा करता आली. तेव्हा समाजवादी विचारसरणीच्या लोकांनी पूजाअर्चा करणे योग्य नाही म्हणून जनआंदोलन छेडले होते. त्यानंतर २०१८ मध्येही मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून देवेंद्र फडणवीस यांना विरोध झाला होता.

पालख्यांच्या स्वागताला मामा की बापू?

जिल्ह्यात माउलींची पालखी ४ जुलैला तर तुकोबारायांची पालखी ५ जुलैला येणार आहे. पालख्यांच्या स्वागताला पालकमंत्री हजेरी लावण्याची परंपरा आहे. यंदा स्वागताला पालकमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे उपस्थित राहणार की सत्तांतरात शहाजीबापूंना संधी मिळाल्यास त्यांना मान मिळणार, याचीही उत्कंठा लागलेली आहे.

Web Title: Will Fadnavis get the opportunity he missed in 2018 or will Uddhav Thackeray take the steering wheel again?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.