मराठा आरक्षण मिळेपर्यंत शाळेला येणार नाही; जाधववाडी येथील प्रकार, विद्यार्थी शाळेत आले अन् निवेदन देऊन गेले
By संताजी शिंदे | Published: February 17, 2024 06:24 PM2024-02-17T18:24:02+5:302024-02-17T18:24:19+5:30
शाळेत आल्यानंतर मुलांनी निवेदन तयार केले व ते मुख्याध्यापक दशरथ गरड यांना दिले.
मोडनिंब (सोलापूर): माढा तालुक्यातील जाधववाडी (मो) येथील शालेय विद्यार्थ्यांचा संकल्प. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही व जरांगे पाटील उपोषण मागे घेत नाहीत तोपर्यंत आम्ही शाळेत येणार नाही जिल्हा परिषद शाळेतील मुला मुलींचा निर्णय. अधिक माहिती की माढा तालुक्यातील जाधवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमीक शाळेत इयत्ता पहिली ते ७ वीचे मुले व मुली शनिवार नेहमी प्रमाणे सकाळी शाळेत आले. मात्र शाळेत आल्यानंतर त्यांनी निवेदन तयार केले व ते मुख्याध्यापक दशरथ गरड यांना दिले.
निवेदन देऊन त्यांनी सांगितले की, आम्ही आजपासून जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही व जरांगे पाटील उपोषण मागे घेत नाहीत तोपर्यंत शाळेत येणार नाही. ऐवढे सांगून शाळेमध्ये आलेले विद्यार्थी घरी निघून गेले. याबाबत मुख्याध्यापक दशरथ गरड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की विद्यार्थी जरी घरी गेली असेल तरी आम्ही सदर शाळेमध्ये तीन शिक्षक असून सर्वजण शाळेची वेळ संपेपर्यंत बसून होतो. रविवार, सोमवारी शाळेला सुट्टी आहे. मंगळवारी विद्यार्थी शाळेत आली तर ठीक नाहीतर आम्ही शाळा उघडून सर्व शिक्षक बसणार आहोत.