तात्पुरत्या सेवेतील डॉक्टरांना कायम करणार; वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2020 12:22 PM2020-11-06T12:22:23+5:302020-11-06T12:26:50+5:30

मंत्र्यांच्या आश्वासनानंतर डॉक्टरांचा संप मागे; मुंबईत झाली चर्चा अन् बैठक 

Will retain doctors in temporary service; Assurance of the Minister of Medical Education | तात्पुरत्या सेवेतील डॉक्टरांना कायम करणार; वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे आश्वासन

तात्पुरत्या सेवेतील डॉक्टरांना कायम करणार; वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे आश्वासन

Next
ठळक मुद्देमुंबई येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी संपात सामील असलेल्या डॉक्टरांशी चर्चा डॉक्टरांना सेवेत कायम करण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोतराज्यातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तात्पुरत्या सेवेतील डॉक्टर उपस्थित होते

सोलापूर : तात्पुरत्या सेवेतील डॉक्टरांनी कायम करण्याच्या मागणीसाठी संप पुकारला होता. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या आश्वासनानंतर डॉक्टरांनी संप मागे घेतला आहे.

सिव्हिल हॉस्पिटलमधील ३४ डॉक्टरांचा या संपात सहभाग होता. संप मागे घेतल्यानंतर गुरुवारी सायंकाळपासून त्यांनी कामास सुरुवात केली.

मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी संपात सामील असलेल्या डॉक्टरांशी चर्चा केली. डॉक्टरांना सेवेत कायम करण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. आमच्यावर विश्वास ठेवून थोडा वेळ द्या. नक्कीच तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी वेळेत सेवेत कायम करण्याचे काम करू, असे आश्वासन दिले.

या बैठकीत राज्यातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तात्पुरत्या सेवेतील डॉक्टर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील डॉ. कुंदन कांबळे, डॉ. प्रज्ञेश पानशेवडीकर, डॉ. संचित खरे, डॉ. गजानन अल्पेवाड उपस्थित होते.

Web Title: Will retain doctors in temporary service; Assurance of the Minister of Medical Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.