शरद पवार पंढरपुरात प्रचारासाठी येणार का ? जयंत पाटील यांनी दिले हे उत्तर...!
By appasaheb.patil | Published: March 30, 2021 12:53 PM2021-03-30T12:53:03+5:302021-03-30T12:54:40+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग
सोलापूर - राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या पंढरपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांना, तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी भगीरथ भालके अन् समाधान आवताडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यासाठी भाजप व राष्ट्रवादीचे बडे नेते पंढरपुरात दाखल झाले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना शरद पवार हे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी येणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारले असता जयंत पाटील म्हणाले की, शरद पवारांना किडनी स्टोनचा त्रास होत आहे. आवश्यकतेनुसार येत्या काही दिवसात त्यांच्यावर शस्त्रक्रिया होईल, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते बाहेर पडतील, मात्र आम्ही त्यांना सांगितले आहे की, पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची आपण काळजी करु नका, हा मतदारसंघ पवार साहेबांना मानणारा वर्ग असलेला आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी काम करत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना सांगणार आहोत की, वैद्यकीय सल्ला मिळाल्यानंतरच आपण या निवडणुकीच्या प्रचारात उतरा.