'अलमट्टी'तून कॅनॉलद्वारे टाकळी पर्यंत पाणी आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार : पालकमंत्री

By बाळकृष्ण दोड्डी | Published: September 7, 2023 03:49 PM2023-09-07T15:49:25+5:302023-09-07T15:50:22+5:30

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाणीटंचाईवर चर्चा

will talk to chief minister to bring water from almatti to tankli through canal said radhakrishna vikhe patil | 'अलमट्टी'तून कॅनॉलद्वारे टाकळी पर्यंत पाणी आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार : पालकमंत्री

'अलमट्टी'तून कॅनॉलद्वारे टाकळी पर्यंत पाणी आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार : पालकमंत्री

googlenewsNext

बाळकृष्ण दोड्डी,  सोलापूर : अलमट्टी धरणातून कॅनॉलद्वारे सोलापुरातील टाकळीपर्यंत पाणी आणू. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून कर्नाटक सरकारकडे पत्रव्यवहार करू अशी, ग्वाही सोलापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गुरुवारी दिली.

गुरुवारी, नियोजन भावनात जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. यात त्यांनी पाणी टंचाईवर चर्चा केली. या बैठकीत सदस्यांनी केलेल्या मागणीनुसार अलमट्टी धरणातून पाणी आणण्यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अलमट्टी धरणातून यापूर्वी टाकळी पर्यंत कॅनॉलद्वारे पाणीपुरवठा झालेला आहे. याचा फायदा सोलापूर शहर आणि दक्षिण सोलापूर तालुक्याला झालेला आहे. यंदाही पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अलमट्टी धरणातून कॅनॉलद्वारे पाणी आणण्याचे प्रयत्न करावेत, अशी मागणी नियोजन समितीच्या सदस्यांनी केली. यास पालकमंत्र्यांनी यावर पालकमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली.
 

Web Title: will talk to chief minister to bring water from almatti to tankli through canal said radhakrishna vikhe patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.