म्हैसाळप्रमाणे अन्य योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:21 AM2021-05-15T04:21:09+5:302021-05-15T04:21:09+5:30
म्हैसाळ योजनेतून सोडलेल्या पाण्याचे पूजन आमदार आवताडे, आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते अक्षय तृतीया सणाच्या मुहूर्तावर श्रीफळ अर्पण करून ...
म्हैसाळ योजनेतून सोडलेल्या पाण्याचे पूजन आमदार आवताडे, आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते अक्षय तृतीया सणाच्या मुहूर्तावर श्रीफळ अर्पण करून केले. याप्रसंगी जि. प. सदस्य शिवानंद पाटील, भाजप तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकूल, जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर, दिगंबर यादव, भारत गरंडे, नामदेव जानकर, अंकुश खताळ, पांडुरंग कांबळे, रमेश काशीद, शहाजी गायकवाड, बंडू गडदे, सुनील पाटील, किसन चौगुले, गौडाप्पा बिराजदार, संतोष कोकरे, दत्ता पाटील, भीमा तांबे, राजू सुतार व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
तालुक्याच्या वाट्याचे पाणी अन्य कोठेही जाणार नाही. जर कोणी अन्यत्र नेण्याचा प्रयत्न झाल्यास मोठा संघर्ष उभा करू, असे आमदार आवताडे यांनी सांगितले. यावेळी आमदाराने संबंधित अधिकाऱ्यांकडून या योजनेची माहिती घेतली.
फोटो
१४मंगळवेढा०१
ओळी
म्हैसाळ योजनेतून सोडलेल्या पाण्याचे पूजन आमदार आवताडे, आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते.