लोकसभा निवडणुक प्रचाराच्या परवानगीसाठी एक खिडकी सुरू; जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले याची माहिती
By appasaheb.patil | Published: March 11, 2019 06:18 PM2019-03-11T18:18:52+5:302019-03-11T18:21:06+5:30
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचार करण्यासाठीच्या आवश्यक परवानगी देण्यासाठी एक खिडकी सुरु करणार आहे. मात्र परवानगी घेण्यासाठी राजकीय ...
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचार करण्यासाठीच्या आवश्यक परवानगी देण्यासाठी एक खिडकी सुरु करणार आहे. मात्र परवानगी घेण्यासाठी राजकीय पक्षांनी विहित मुदतीत अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भासले आज येथे केले.
लोकसभा निवडणूक व आदर्श आचारसंहिता संदर्भात राजकीय पक्षांना माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतू सभागृहात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, जिल्हा कोषागार अधिकारी राहुल कदम, जिल्हा परिषदेचे वित्त व लेखाधिकारी महेश आवताडे यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.भोसले म्हणाले, निवडणुकीत राजकीय पक्षांना प्रचार करण्यासाठी आवश्यक परवानग्या देण्यासाठी एक खिडकी सुरु करण्यात येणार आहे.मात्र आवश्यक परवानगी मिळण्यासाठी राजकीय पक्षांनी मुदतीत अर्ज करणे आवश्यक आहे.यामध्ये प्रचारसभा, रॅली, लाऊड स्पिकर, मंडप यासह आवश्यक बाबींच्या परवानगीसाठी मुदतीत अर्ज करावेत.
डॉ. भोसले म्हणाले, भारत निवडणूक आयोगाने १० मार्च २०१९ पासून लोकसभा निवडणूक २०१९ साठी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून राजकीय पक्षांनी देखील आचारसंहितेचे पालन करावे. राजकीय पक्षांनी लावलेले बॅनर्स, पोस्टर्स, कटआऊट तात्काळ काढून घ्यावेत. अनधिकृतपणे बॅनर्स, पोस्टर्स, कटआऊट आढळून आल्यास निवडणूक आयोगाकडील मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधितावर कारवाई करण्यात येइील.राज्यात प्लॅस्टिक वापरावर बंदी असल्याने राजकीय पक्षानी प्लॅस्टिकचा वापर टाळावा.
डॉ. भोसले म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने सर्व तयार केली असून निवडणूकीसाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या सर्व कक्षांचे कामकाज सुरु करण्यात आले आहे. आचारसंहितेबाबत काही शंका असल्यास संबंधितानी आचारसंहिता कक्षाकडे संपर्क साधावा.