आला हिवाळा, त्वचा सांभाळा; त्वचा कोरडी, रखरखीत, रंगहीन पडण्याच्या तक्रारी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2021 05:38 PM2021-12-06T17:38:05+5:302021-12-06T17:38:11+5:30

हिवाळ्यात प्रामुख्याने लहान मुले, ज्येष्ठ व मधुमेही रुग्णांना हा त्रास अधिक जाणवतो.

Winter has come, take care of the skin; Complaints of dry, rough, discolored skin increased | आला हिवाळा, त्वचा सांभाळा; त्वचा कोरडी, रखरखीत, रंगहीन पडण्याच्या तक्रारी वाढल्या

आला हिवाळा, त्वचा सांभाळा; त्वचा कोरडी, रखरखीत, रंगहीन पडण्याच्या तक्रारी वाढल्या

Next

सोलापूर : हिवाळ्यात त्वचेची सर्वात सामान्य समस्या म्हणजे त्वचा कोरडी, रखरखीत त्वचा, त्वचेला खाज सुटणे अशा त्रासांना सामोरे जावे लागते म्हणून आपली त्वचा सांभाळावी. थंड वारा आणि कोरड्या हवामानामुळे त्वचा कोरडी पडते आणि तडे जाऊ लागतात. त्वचा केवळ कोरडी होत नाही तर निर्जीव आणि रंगहीन दिसते. अशा परिस्थितीत, हिवाळ्याच्या हंगामात आपल्या त्वचेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्वचा कोरडी पडण्यामागे, वाढते वय, तीव्र रासायनिक साबण किंवा क्रीम वापरणे, खूप गरम पाण्याने अंघोळ करणे, तीव्र साबणाचा वापर, पावडरचा वापर आणि सतत बदलते, थंड वातावरण अशी अनेक कारणे असू शकतात असे त्वचारोगतज्ज्ञ म्हणणे आहे.

त्वचा फुटतेय, कोरडी पडतेय

त्वचा कोरडी पडणे, ओठ फुटणे, भेगा पडणे, हाताचे कोपर, पायाचे घोटे, गुडघे काळे पडणे, रक्त येणे, खाज सुटणे आणि जंतूसंसर्ग होणे अशा अजूनच त्रासदायक गोष्टींमध्ये होऊ शकते. इसब, अटॉपिक डर्माटायटिस, सोरायसिस, इचथिओसिस, रोझेशिआ अशा त्वचाविकारांसाठी, थायरॉईड, मधुमेह, अशक्तपणा, पोषणमूल्यांचा अभाव, यकृताचे आजार आणि स्त्रियांमध्ये मेनोपॉज या बाबीही कारणीभूत असू शकतात.

त्वचेची कशी काळजी घ्यावी

त्वचेत किंचित ओलावा असतानाच मॉइश्चरायजर लावावे. टेरिकोट कपडे त्वचेवर घासली गेल्यास खाज सुटते, म्हणून सुती कपडे घालावेत. भांडी, धुणी, इतर स्वच्छतेची कामे करताना रबरी हातमोजे वापरावेत, त्वचा काळवंडते दर तीन तासांनी सनक्रीम लावावे, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधी दुकानांमध्ये मिळणारी प्रॉडक्ट्स वापरू नयेत.

हिवाळ्यात प्रामुख्याने लहान मुले, ज्येष्ठ व मधुमेही रुग्णांना हा त्रास अधिक जाणवतो, संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे. याशिवाय खोबरेल तेल, मॉश्चरायझर लावावे. अति कोरडेपणा, त्वचेला भेगा किंवा वरीलपैकी त्रास जास्त प्रमाणात जाणवत असल्यास त्वरित त्वचारोगतज्ज्ञाला दाखवावे.

- डॉ. सचिन कोरे, त्वचारोगतज्ज्ञ

--

Web Title: Winter has come, take care of the skin; Complaints of dry, rough, discolored skin increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.