केस माघारी घ्या म्हणून महिलेस बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:27 AM2021-07-07T04:27:43+5:302021-07-07T04:27:43+5:30
या प्रकरणी दीपाली गलांडे (वय २४, व्यवसाय घरकाम व शेती. रा. चिखलठाण नं. १ ता. करमाळा) यांनी पोलिसात फिर्याद ...
या प्रकरणी दीपाली गलांडे (वय २४, व्यवसाय घरकाम व शेती. रा. चिखलठाण नं. १ ता. करमाळा) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ‘चिखलठाण नं. १ मध्ये सासऱ्याच्या नावे ५ एकर २० गुंठे शेती आहे. रविवारी (ता. ४) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास शेतात काम करीत असताना भावकीतील राजाराम बलभीम गलांडे व तीन महिला (सर्व रा. चिखलठाण नं. १) आमचे शेतात आल्या. शिवीगाळ व दमदाटी करून ‘कोर्टातील केस काढून घे.. तुझ्या नवऱ्याला सांग’, असे म्हणून राजाराम गलांडे याने दगडाने मारून जखमी केले. त्यांच्याबरोबर आलेल्या एका महिलेने मारहाण करून शिवीगाळी केली तर इतर दोन महिलांनी कोयत्याने मारून जखमी केले. मारहाण करीत असताना मोठ्याने ओरडल्याने आवाज ऐकून नवरा मिथुन, सासरे नवनाथ हे आले व भांडण सोडवासोडवी केली. पुढील तपास करमाळा पोलीस करीत आहेत.
----