उत्तर तालुक्यात १२ उमेदवारांची माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:23 AM2021-01-03T04:23:19+5:302021-01-03T04:23:19+5:30
जातीचा दाखला जोडला नाही. जातपडताळणी कार्यालयाला पडताळणीसाठी प्रस्ताव सादर केला नाही. उमेदवारांचे वय कमी असणे व इतर कारणांमुळे १३ ...
जातीचा दाखला जोडला नाही. जातपडताळणी कार्यालयाला पडताळणीसाठी प्रस्ताव सादर केला नाही. उमेदवारांचे वय कमी असणे व इतर कारणांमुळे १३ उमेदवारांचे १४ अर्ज गुरुवारी अपात्र झाले होते. तालुक्यातून दाखल झालेल्या ७५१ उमेदवारांच्या ७५२ अर्जांपैकी सेवालालनगर, भोगाव, भागाईवाडी, तळेहिप्परगा, वडाळा, पाथरी प्रत्येकी १, तिर्हे ४, भागाईवाडी ३ याप्रमाणे १३ अर्ज अपात्र झाले होते. शुक्रवारी खेड व सेवालालनगर प्रत्येकी १ तर भोगाव व पडसाळीचे प्रत्येकी ५ याप्रमाणे १२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.
पडसाळी ग्रामपंचायतीसाठी ९ सदस्य निवडून द्यावयाचे असून आता १० उमेदवारांचे अर्ज शिल्लक आहेत. अनुसूचित जातीच्या एका जागेसाठी शिल्लक राहिलेल्या दोन अर्जापैकी एक अर्ज मागे घेण्यात येणार आहे. यामुळे सर्वच ९ सदस्य अविरोध निवडून येणार आहेत. अजित शिरसट, स्वाती समाधान भोसले, तबस्सुम मियासाहेब शेख, रेणुका माळी, माणिक माळी, ज्योत्स्ना ज्योतीराम पाटील, सिमिंताबाई परसराम भोसले व महादेव भोसले हे आठ सदस्य बिनविरोध झाले आहेत. शनिवार व रविवारी तहसील कार्यालयाला सुट्टी असल्याने सोमवारी अर्ज मागे घेण्यास एकच गर्दी होणार आहे. सोमवारीच २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. पाथरी, राळेरास, पडसाळी व साखरेवाडी या ग्रामपंचायती बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.