दोन दिवसात सोलापूर शहरातील ४७ अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली, मनपा, शहर पोलीसांची संयुक्त कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 12:15 PM2017-11-09T12:15:16+5:302017-11-09T12:17:15+5:30

शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याच्या मोहिमेत दुसºया दिवशी एक दर्गाह, एका बुद्धविहारासह ४७ स्थळे मनपा व पोलिसांच्या संयुक्त पथकाने हटविली.

Within two days, 47 unauthorized religious places in Solapur city, Municipal corporation, joint action taken by the city police | दोन दिवसात सोलापूर शहरातील ४७ अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली, मनपा, शहर पोलीसांची संयुक्त कारवाई

दोन दिवसात सोलापूर शहरातील ४७ अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली, मनपा, शहर पोलीसांची संयुक्त कारवाई

Next
ठळक मुद्देशहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याच्या मोहिमेला ६ नोव्हेंबरपासून सुरुवातमनपा, शहर पोलीसांची संयुक्त कारवाई तीन ठिकाणी धार्मिक स्थळे स्वत:हून संबंधितांनी काढून घेतली


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ८ : शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याच्या मोहिमेत दुसºया दिवशी एक दर्गाह, एका बुद्धविहारासह ४७ स्थळे मनपा व पोलिसांच्या संयुक्त पथकाने हटविली.
शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याच्या मोहिमेला ६ नोव्हेंबरपासून सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी ११ अनधिकृत स्थळे हटविण्यात आली. कन्हैयाकुमारच्या सभेला पोलीस बंदोबस्त दिल्याने ७ नोव्हेंबर रोजी मोहीम घेता आली नव्हती. बुधवारी ही मोहीम पुढे सुरू ठेवण्यात आली. या मोहिमेत तीन ठिकाणी धार्मिक स्थळे स्वत:हून संबंधितांनी काढून घेतली तर ४४ ठिकाणी जेसीबीने पाडकाम मोहीम राबविण्यात आली. यासाठी तीन पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. आजच्या मोहिमेत कुठेही विरोध झाला नाही. सायंकाळपर्यंत ही मोहीम शांततेत पार पडल्याचे बांधकाम विभागाचे उपअभियंता रामचंद्र पेंटर यांनी सांगितले. 
पोलीस ठाणेनिहाय हटविण्यात आलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. एमआयडीसी: हैदराबाद रोड विडी घरकूल— नवनीत तरुण मंडळ, म्हैसम्मा मंदिर बी व सी ग्रुपमधील दोन, गणेश मंदिर, मसोबा मंदिर, लक्ष्मीराज गणेश मंडळ, पोशम्मा मंदिर, गुरूदत्त मंदिर, स्वयंभू हनुमान मंदिर समतानगर, गणेश मंदिर ब्रह्मनाथनगर, यल्लम्मा मंदिर सग्गमनगर, हनुमान मंदिर मल्लिकार्जुननगर, लक्ष्मी मंदिर, कल्पनानगर, दत्त मंदिर जुना अक्कलकोट नाका, मारुती मंदिर, शक्ती गणेश मंदिर जुना कुंभारी नाका, महालक्ष्मी मंदिर गुल्लापल्ली कारखान्याजवळ, देवी मंदिर आदित्य फार्मास्युटिकलजवळ, पोशम्मा व हनुमान मंदिर आशानगर, स्कंदमाता मंदिर न्यू सुनीलनगर, महादेव मंदिर करली चौक, अंबिका मंदिर विजयलक्ष्मीनगर.
विजापूर नाका: मरिआई मंदिर, वज्रबोधी बुद्धविहार माजी सैनिकनगर, यल्लम्मा मंदिर जवाननगर, नागनाथ मंदिर पारधी वसाहत, अंबाबाई मंदिर बनशंकरी चौक, गणेश मंदिर कोळी समाज सोसायटी, रेणुका देवी संभाजी तलावाजवळ, ओंकारेश्वर मंदिर जनता बँक कॉलनी, दत्त मंदिर सैफुल, हनुमान मंदिर सैफुल भाजी मंडई, महालक्ष्मी व म्हसोबा मंदिर यामिनीनगर, मौलाली पीरअल्ली अबुबकरअली दर्गा गरिबी हटाव झोपडपट्टी नं. १, दत्त मंदिर हरळय्यानगर. 
या कारवाईत झोन अधिकारी चोबे, आवताडे, अवेक्षक बाबर, खानापुरे, गोडसे, गुंड, दिवान यांच्यासह जेसीबी, डंपर, वायरमनसह १५० कर्मचाºयांचा ताफा होता.
---------------------
स्वत:हून केले पाडकाम
नीलमनगर भाग १ मधील फरशी बोळ येथे असलेले शिव व देवीचे मंदिर संबंधितांनी स्वत:हून काढून टाकले. त्याचबरोबर ताई चौकाजवळील इरण्णा वीरगोंडा यांच्या घराजवळ असलेले श्रीकृष्ण मंदिर भक्तांनी स्वत:हून काढून टाकले. याबाबत तेथील नागरिकांची समजूत घालण्याचे काम अवेक्षक खानापुरे यांनी केले. अशाप्रकारे दोन दिवसांच्या मोहिमेत ५८ अनाधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यात आली आहेत. आता आणखी १७५ स्थळे राहिली आहेत. 
--------------------
अशांनी अर्ज करु नये
१९६0 च्या आधी खासगी जागेत असलेल्या धार्मिक स्थळांबाबत अनेकांनी पुरावे सादर करण्यास सुरूवात केली आहे. असे अर्ज सुनावणीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक रस्ता किंवा जागेवर असलेली धार्मिक स्थळे नियमित करता येत नाहीत. त्यामुळे अशा स्थळांशी संबंधित असलेल्यांनी व नोटिसा मिळालेल्यांनी ही स्थळे स्वत:हून काढून घ्यावीत, अन्यथा या पथकामार्फत ती काढून टाकण्यात येणार आहेत, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Web Title: Within two days, 47 unauthorized religious places in Solapur city, Municipal corporation, joint action taken by the city police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.