पुण्याच्या नाट्य केंद्रातील महिलेला बार्शीत आणून केला अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:27 AM2021-09-15T04:27:11+5:302021-09-15T04:27:11+5:30
बार्शी : पुणे जिल्ह्यातील नृत्यकला केंद्रात गायिका म्हणून काम करणाऱ्या एका महिलेच्या ओळखीचा फायदा घेऊन तू माझ्याबरोबर ...
बार्शी : पुणे जिल्ह्यातील नृत्यकला केंद्रात गायिका म्हणून काम करणाऱ्या एका महिलेच्या ओळखीचा फायदा घेऊन तू माझ्याबरोबर बार्शीला आली नाही, तर मुलांना ठार मारण्याची धमकी देऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून अत्याचारप्रकरणी बार्शीतील रिक्षाचालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
अभिजीत भीमराव मुकटे (रा.भवानी पेठ बार्शी) असे त्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्यास अटक करून न्यायमूर्ती आर.एस.धडके यांच्यासमोर उभे करताच चार दिवस पोलीस कोठडी दिली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही पुणे जिल्ह्यातील एका नाट्य कला केंद्रात गायनाचे काम करत होती. आरोपी हा तेथे गाणे ऐकण्यासाठी व नृत्य पहाण्यासाठी जात होता. त्याची या महिलेशी चार वर्षांपूर्वी ओळख झाल्याने तो तिला बार्शी येथे चल, तू आली नाहीस तर तुझ्या मुलांना ठार मारण्याची धमकी देऊन तिला चार महिन्यांपूर्वी आणून भाड्याच्या खोलीत ठेवले. तिला वारंवार भीती दाखवून जबरदस्तीने दुष्कर्म करत होता. त्यावेळी तिने तिच्या ९ वर्षाच्या मुलीस भीतीपोटी बहिणीकडे पाठविले. मुलगा तिच्यासोबत होता. तर पीडितेस तू तुझ्या गावाकडे गेली, तर त्याने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. याबाबत पीडित महिला पोलिसात तक्रार देण्यासाठी जाताना तिला मारहाणही केली होती. आरोपीस अटक करून न्यायालयात उभे करताच १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली. याचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक उत्तमराव सस्ते करीत आहेत.