गरम पाणी अंगावर पडल्याने महिला जखमी
By दिपक दुपारगुडे | Updated: July 18, 2024 20:03 IST2024-07-18T20:03:10+5:302024-07-18T20:03:31+5:30
महिला सकाळच्यावेळी अंघोळीसाठी कळशीत पाण तापवायला ठेवले होते. पावणे सहाच्या सुमारास कळशीतील पाणी बादलीत ओतताना चुकून गरम पाणी अंगावर, गुडघ्यावर पडल्याने कातडी सोलली गेली.

गरम पाणी अंगावर पडल्याने महिला जखमी
सोलापूर : अंघोळीसाठी तापवलेले पाणी बादलीत ओतताना ते अंगावर पडल्यानं महिला भाजली आहे. तिला उपरासासाठी गुरुवारी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जया एकनाथ सुतार (वय ३४, रा. कवटे, ता. द. सोलापूर) असे भाजलेल्या महिलेचे नाव आहे.
महिला सकाळच्यावेळी अंघोळीसाठी कळशीत पाण तापवायला ठेवले होते. पावणे सहाच्या सुमारास कळशीतील पाणी बादलीत ओतताना चुकून गरम पाणी अंगावर, गुडघ्यावर पडल्याने कातडी सोलली गेली.
दाह सहन होत असल्याने प्राथमिक उपचार करुन घेतले. त्यानंतर वडील विठ्ठल यांनी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु असून, त्या शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडे या प्रकाराबद्दल सिव्हील पोलीस चौकीकडे खबर देण्यात आली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.