वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या धडकेने महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:37 AM2020-12-16T04:37:19+5:302020-12-16T04:37:19+5:30

पंढरपूर : चंद्रभागेच्या वाळवंटातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनाने दुचाकीवरून जाणाऱ्या पती-पत्नीला मागून धडक दिली. या अपघातात जयश्री बारले ...

Woman killed in sand truck crash | वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या धडकेने महिला ठार

वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या धडकेने महिला ठार

googlenewsNext

पंढरपूर : चंद्रभागेच्या वाळवंटातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनाने दुचाकीवरून जाणाऱ्या पती-पत्नीला मागून धडक दिली. या अपघातात जयश्री बारले (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रकाश बारले (वय ५४, रा. गोविंदपुरा, पंढरपूर) यांच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी सकाळी ६ वाजता पंढरपुरातील नवीन पुलावर ही दुर्दैवी घटना घडली.

जयश्री व प्रकाश बारले हे पहाटे साडेसहाच्या सुमारास गोविंदपुरा येथून ६५ एकर परिसरात फिरण्यासाठी चालले होते. यादरम्यान दोघेजण नवीन पुलावर आले. यावेळी त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या विनानंबरच्या वाहनाने त्यांना जोराने धडक दिली. यामध्ये जयश्री बारले यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रकाश बारले हे गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम पंढरपुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; परंतु प्रकाश बारले यांची प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात नेण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. दोन्ही वाहने ताब्यात घेतली. या प्रकरणी त्यांच्याविरुध्द गुन्हा नोंदला आहे. विक्रम अभंगराव (रा. अंबिका नगर, पंढरपूर) हा त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवत होता. तर त्याच्याबरोबर महावीर अभंगराव (रा. अंबिका नगर, पंढरपूर) हा होता. यामुळे दोघांविरुध्द गुन्हा नोंदला आहे.

गृहराज्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज

चंद्रभागा नदीतून वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. यामध्ये काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे सांगण्यात आले होते. यावर त्यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी बैठक घेऊन संबंधित विभागाला कारवाई करण्याबाबत आदेश देऊ, असे सांगितले होते. या प्रकरणात गृहराज्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी विक्रम शिरसट यांनी केली.

-----

वाळू माफियांचे मोबाइल तपासा

चंद्रभागा नदीपात्रातून रोज अवैद्यरित्या वाळू उपसा होतो; परंतु कारवाई केव्हातरी होते. यामुळे वाळू कारवाईदरम्यान पकडलेल्या व्यक्तींचे मोबाइल रेकॉड तपासावे. यानंतर वाळू चोरीत कोणकोण आहेत हे समजेल आणि वाळूचे रॅकेट उघड होईल, अशीही मागणी होत आहे.

फोटो: १५पंड०१

Web Title: Woman killed in sand truck crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.