शेतीची कामे आटपून पुण्याकडे जाणाऱ्या महिला एसटीच्या धडकेत ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:16 AM2021-07-04T04:16:40+5:302021-07-04T04:16:40+5:30

नागरबाई भास्कर भडकवाड (वय ५६, रा.सुर्डी ता.बार्शी, सध्या उरळी कांचन) असे मयत महिलेचे नाव आहे. याबाबत कुर्डूवाडी पोलिसांत सत्यवान ...

Woman killed in ST collision on her way to Pune | शेतीची कामे आटपून पुण्याकडे जाणाऱ्या महिला एसटीच्या धडकेत ठार

शेतीची कामे आटपून पुण्याकडे जाणाऱ्या महिला एसटीच्या धडकेत ठार

Next

नागरबाई भास्कर भडकवाड (वय ५६, रा.सुर्डी ता.बार्शी, सध्या उरळी कांचन) असे मयत महिलेचे नाव आहे. याबाबत कुर्डूवाडी पोलिसांत सत्यवान दत्तू हनवते (रा.बारलोनी, ता. माढा) यांनी बस चालकाविरुद्ध फिर्याद दिली आहे. बस चालक अभिनाय भास्कर दीक्षित याच्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.

पोलीस सूत्रांनुसार, मृत नागरबाई भडकवाड या उरळीकांचन येथे आपल्या मुलाकडे राहत होत्या. काही दिवसापूर्वी त्या आपल्या मूळ सुर्डी या गावी शेतीच्या कामासाठी आल्या होत्या. सर्व कामे आटोपून त्या परत मुलाकडे जाण्यासाठी शनिवारी सुर्डीहून माढामार्गे कुर्डूवाडी बस स्थानकावर आल्या होत्या. तेथून त्या दुसऱ्या बसने पुण्याला जाणार होत्या. सायंकाळी चार वाजता पुणे बार्शी (एमएच-१४,बीटी-३२३१) या बसमध्ये चढून त्यांनी वाहकाला विचारले असता, वाहकाकडून बस बार्शीला चालली आहे, असे सांगितले. त्यावेळी ती महिला बसखाली उतरली व बाजूला झाली. यावेळी त्या बस चालकाने समोर उतरलेल्या त्या महिलेला न पाहता, बस तशीच चालवल्याने महिलेस धडक बसली. यात ती गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाली. यावरून बस चालकाविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.

Web Title: Woman killed in ST collision on her way to Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.