कुंटणखान्यावर छापा टाकून महिलेची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:48 AM2020-12-05T04:48:29+5:302020-12-05T04:48:29+5:30
मुक्ताईनगर येथील एका घरात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून त्याबाबतची खात्री करून घेतली. त्यानंतर अनैतिक ...
मुक्ताईनगर येथील एका घरात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून त्याबाबतची खात्री करून घेतली. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक खात्याच्या पथकाने त्या घरावर छापा टाकला. त्यावेळी महादेवी पाटील ही महिला तरुणीला डांबून ठेवून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती समोर आली. त्या उत्पन्नातून पाटील ही स्वत:चा उदरनिर्वाह चालवत होती.
ही कारवाई पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे, उपनिरीक्षक प्रशांत क्षीरसागर, राजेंद्र बंडगर, शन्नुराणी इनामदार, नफिसा मुजावर, अर्चना गवळी, रमादेवी भुजबळ, महादेव बंडगर, दादा गोरे या पथकाने केली.
-
पंधरवड्यातील तिसरी घटना
सोलापुरात कुंटणखाण्यावर छापा टाकून महिलांची मुक्तता करण्याची ही तिसरी घटना असून, एसटी स्टॅंड परिसरातील एका लॉजवर धाड टाकून नुकतीच दोन महिलांची सुटका केली होती. शिवाय दक्षिण सोलापूर तालुक्यातील हगलूर येथेही छापा टाकून महिलेची सुटका करण्यात आली होती.