अक्कलकोटमधील महिलेचा ऑक्सिजनअभावी तडफडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:24 AM2021-04-23T04:24:19+5:302021-04-23T04:24:19+5:30

अक्कलकोट : मोठ्या कष्टाने पतीच्या खांद्याला खांदा लावून अख्ख्या संसार उभा केला. त्या महिलेला कोरोनाची लागण झाली, मात्र उपचारासाठी ...

Woman suffers from lack of oxygen in Akkalkot | अक्कलकोटमधील महिलेचा ऑक्सिजनअभावी तडफडून मृत्यू

अक्कलकोटमधील महिलेचा ऑक्सिजनअभावी तडफडून मृत्यू

Next

अक्कलकोट : मोठ्या कष्टाने पतीच्या खांद्याला खांदा लावून अख्ख्या संसार उभा केला. त्या महिलेला कोरोनाची लागण झाली, मात्र उपचारासाठी वेळेवर बेड मिळाला नाही. अखेर बेड मिळाला पण तेथे ऑक्सिजनची सुविधा नव्हती. ज्यावेळी ऑक्सिजनअभावी महिलेचा तडफडून मृत्यू झाला, तेव्हा मुलगा अन् पतीही बाधित होते. मुलाला अंतिम दर्शनाची सोय झाली पण पतीला झाली नसल्याने आयुष्यभर साथ देणाऱ्या पत्नीचे तोंडही पाहता आलं नसल्याची खंत पतीने व्यक्त केली.

समर्थनगर येथील भागम्मा शरणप्पा मरतुरे (वय ४८) या महिलेने अत्यंत जिद्दीने, कष्टाने खडतर परिस्थितीवर मात करत पतीच्या खांद्याला खांदा लावून संसारवेल फुलवली. दोन्ही मुलींचे लग्न लावून दिले. एकुलत्या एक मुलासाठी अक्कलकोट आडत बाजार येथे एक दुकान खरेदी केले. सर्व आनंदात होते. लवकरच अनिलचे थाटात लग्न करायचे होते. पण कोरोनाने घात केला. भागम्मा यांना चार दिवसांपूर्वी त्रास सुरू झाला. मुलाने सोलापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यासाठी पूरेपूर प्रयत्न केले. मात्र, एकाही हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला नाही. शेवटी सिव्हीलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला मिळाला. त्यानुसार तेथे गेले असता, बेड मिळाला पण त्याठिकाणी वेळेवर ऑक्सिजन मिळाला नाही. त्यामुळे बुधवारी तडफडून भागम्मा यांचा मृत्यू झाला.

पत्नीच्या मृत्यूचे वृत्त कळताच पती बेशुद्ध

दरम्यान, या महिलेचा मुलगा व पती दोघेही पॉझिटिव्ह होते. त्यामुळे त्यांना अक्कलकोट येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले. जेव्हा आईच्या मृत्यूची बातमी कळली, तेव्हा मुलाच्या आणि तिच्या पतीच्या पायाखालची जमीनच सरकली. पती तर बेशुद्धच पडले. या परिस्थितीत तेथील लोकांनी त्यांना सावरले.

आईचे प्रेत सिव्हीलमध्येच बांधून ठेवलेले आणि त्याठिकाणी दोन्ही बहिणी व नातेवाईक आलेले होते. मात्र, अंत्यविधीसाठी नंबर असल्याने प्रशासनाने थांबण्याचा सल्ला दिला. दुसऱ्या दिवशी गुरुवारी दुपारी १२ वाजता नंबर आला. त्यापूर्वी रात्रभर क्वारंटाईन सेंटरमध्ये शेवटचे एकदा तोंड पाहावे म्हणून धडपडणाऱ्या मुलाला जाण्यास परवानगी मिळेना. शेवटी कसेबसे उशिराने जाण्यास परवानगी मिळाली. यावेळी खचलेल्या पतीला मात्र त्या परिस्थितीत पत्नीचे शेवटचे दर्शन घेता आले नाही, ही खंत त्यांना जीवनभर सतावत राहील.

आईने कष्टाने संसारवेल फुलवली... आनंदात असताना दु:खाचा डोंगर कोसळला

आईने जीवनात फार मोठ्या कष्टाने वडिलांना साथ देऊन संसार उभा केला. आता चांगले दिवस आले होते. आनंदात असतानाच ती आमच्यातून निघून गेली. अल्पावधीतच कोरोनाने आमच्या कुटुंबाचे फार मोठे नुकसान केले आहे. तिची सेवा करण्याचा संधीसुद्धा आम्हाला मिळाली नाही. ऑक्सिजनअभावी आईचा मृत्यू झाला, हे आमचे दुर्दैव आहे, अशी भावना मुलगा अनिल मरतुरे यांनी व्यक्त केली.

फोटो

२२ भागम्मा मरतुरे

Web Title: Woman suffers from lack of oxygen in Akkalkot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.