बादोलेत जिरामणी पळविताना महिलेला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:25 AM2021-08-23T04:25:02+5:302021-08-23T04:25:02+5:30

अक्कलकोट : बादोले येथे एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातून अर्धा तोळ्यांची जिरामणी पळवली आहे. चोरीचा हा प्रकार होता ...

The woman was caught fleeing Jiramani in Badole | बादोलेत जिरामणी पळविताना महिलेला पकडले

बादोलेत जिरामणी पळविताना महिलेला पकडले

Next

अक्कलकोट : बादोले येथे एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातून अर्धा तोळ्यांची जिरामणी पळवली आहे. चोरीचा हा प्रकार होता असताना फिर्यादीने आरोपीला रंगेहाथ पकडले आहे.

ही घटना २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत उत्तर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत नम्रता सुरेश माशाळकर (रा. बादोले) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार २२ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्याने घराला कडीकोयंडा लावून जवळ राहणारे भाऊ अमर गायकवाड याला राखी बांधण्यासाठी गेल्या होत्या. संशयित आरोपी अनिता राजेंद्र पाटोळे ही महिला कडी काढून घरात प्रवेश करून कपाटातील अर्ध्या तोळ्यांचे सोन्याचे जिरामणी काढून घेतले. दरम्यान नम्रता घरी आल्या असता, घरात चोरी करताना ती रंगेहाथ सापडली.

Web Title: The woman was caught fleeing Jiramani in Badole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.