तुझे फोटो सोशल मीडियावर टाकेन म्हणत महिलेला पाजले विषारी औषध

By दिपक दुपारगुडे | Published: August 8, 2023 06:47 PM2023-08-08T18:47:46+5:302023-08-08T18:48:18+5:30

करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

woman was given poisonous medicine saying that will post her photos on social media | तुझे फोटो सोशल मीडियावर टाकेन म्हणत महिलेला पाजले विषारी औषध

तुझे फोटो सोशल मीडियावर टाकेन म्हणत महिलेला पाजले विषारी औषध

googlenewsNext

दीपक दुपारगुडे, सोलापूर : ‘तू माझ्या बरोबर चल अन्यथा सोशल मीडियावर तुझे फोटो व्हायरल करेल’ अशी धमकी देऊन विषारी औषध पाजून एका विवाहित २२ वर्षाच्या महिलेला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. महिलेने यामध्ये फिर्याद दिली आहे. 

फिर्यादी महिला व संशयित आरोपी यांच्यात कामावर असताना ओळख झाली. त्यातून त्यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर ते पुणे येथे एका ठिकाणी कामासाठी गेले होते. तेव्हा या प्रकरणामध्ये फिर्यादी हरवले असल्याचे म्हणून करमाळा पोलिसात पतीच्या तक्रारीवरून नोंद झाली होती. दरम्यान संशयित आरोपी हा फिर्यादीच्या पतीच्या मोबाइलवर सतत मेसेज करत होता. त्यामुळे फिर्यादीच्या पतीने संबंधित सिमकार्ड बंद केले होते. त्यानंतर फिर्यादीच्या घरी कोणी नसताना संशयित आरोपी घरी आला. ‘तू माझ्याबरोबर चल, तू नाही आली तर खल्लास करीन, तुझ्या कुटुंबातील कोणालाच सोडणार नाही’, असे म्हणत धमकी दिली. त्यानंतर संशयित आरोपीने पुन्हा तिच्याशी संपर्क साधला. तिचे फोटो सोशल मीडियावर टाकेन अशी धमकी दिली. दरम्यान पुन्हा ५ ऑगस्टला त्याने घरी कोण नसताना फिर्यादीला नेण्यासाठी आला. तेव्हा तिने नकार दिला. तेव्हा त्याने मारहाण करून तिला बळजबरीने विषारी औषध पाजल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: woman was given poisonous medicine saying that will post her photos on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.