वैरण पेटविल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेचे पाडले दात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:54 AM2021-01-13T04:54:41+5:302021-01-13T04:54:41+5:30

डोंगरगाव येथील शालन माणिक इंगोले ही ४५ वर्षीय महिला सोमवारी सकाळी ७च्या सुमारास जनावरांची साफसफाई करीत होती, यावेळी त्यांनी ...

The woman who asked for an answer to the burning of fodder lost her teeth | वैरण पेटविल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेचे पाडले दात

वैरण पेटविल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेचे पाडले दात

Next

डोंगरगाव येथील शालन माणिक इंगोले ही ४५ वर्षीय महिला सोमवारी सकाळी ७च्या सुमारास जनावरांची साफसफाई करीत होती, यावेळी त्यांनी शेतात लावलेल्या ज्वारीच्या २०० पेंढ्याची वैरण घराशेजारील लोचना भीमराव इंगोले हिने काडीने पेटविल्यामुळे त्यांचे सुमारे दोन हजार रुपयांचे नुकसान झाले होते. याबाबत तिने त्यांना जाब विचारला असता लोचना इंगोले यांनी तुम्ही आमच्या रानात वैरण का लावली म्हणून मी पेटवली, असे सांगितले. दरम्यान, तिने पती भीमराव इंगोले व मुलगा सचिन इंगोले यांना बोलावून घेतले. यावेळी तिने तुम्ही आमच्याच शेतात वैरण का लावली म्हणून शालन हीस शिवीगाळ व दमदाटी करीत लोचना हिने तिच्या केसाला धरून भीमराव इंगोले यांनी उजव्या हाताने तोंडावर मुक्का मारल्याने तोंडातील दोन दात पाडून जवळच पडलेल्या काठीने तिच्या उजव्या बाजूच्या खांद्यावर व डोक्यास मारून जखमी केले. या भांडणात शालन हिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र कोठेतरी पडून गहाळ झाले. याबाबत शालन इंगोले यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: The woman who asked for an answer to the burning of fodder lost her teeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.