महिलेस मारहाण; ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल पोलीस अधीक्षकांच्या हस्तक्षेपाने मिळाला न्याय
By admin | Published: May 9, 2014 09:13 PM2014-05-09T21:13:27+5:302014-05-09T23:58:05+5:30
दक्षिण सोलापूर : दोन महिन्यांपूर्वी होटगी येथे दलित महिलेला झालेल्या मारहाणीची पोलीस अधीक्षकांनी गंभीर दखल घेतली़ त्यामुळेच सात जणांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला़ तलाठी कार्यालयाला कुलूप लावणार्या आंदोलकांवर तातडीने गुन्हा दाखल करणारे वळसंगचे पोलीस महिला मारहाण प्रकरणी दोन महिने तटस्थ का राहिले? असा प्रश्न निर्माण झाला आहे़

होटगी येथील लायव्वा शिवराम चाबुकस्वार (वय ६०) या महिलेस भिंत बांधण्याच्या कारणाने १५ मार्च २०१४ रोजी शेजार्यांनी मारहाण केली़ २१ मार्च रोजी दुसर्यांदा मारहाण झाली़ सुधीर चाबुकस्वार यांनी वळसंग पोलिसांत तक्रार दाखल करूनही दखल घेतली नाही़ अखेर या महिलेने न्यायासाठी पोलीस अधीक्षक मकरंद रानडे यांच्याकडे धाव घेतली़ तिच्या तक्रारीनंतर चक्रे वेगाने फिरली़ पोलीस अधीक्षकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक जाधव यांच्याकडे तपास सोपवला़ सत्यता समोर येताच जाधव यांनी सात जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला़
चंद्रकांत प्रभू उमराणी, प्रभू चंद्रकांत उमराणी, श्रीशैल चंद्रकांत उमराणी, केदार उमराणी, धर्मराज उमराणी, काशिनाथ उमराणी, श्रीशैल रायप्पा गंगदे (रा़ होटगी) या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला़ चंद्रकांत उमराणी यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली़ तलाठी कार्यालयाला कुलूप ठोकल्याप्रकरणी छायाचित्रावरून कोतवालाच्या फिर्यादीनुसार १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला़ तेच पोलीस महिला मारहाण प्रकरणी इतके उदासीन कसे? असा सवाल उपस्थित केला जात आहे़ (प्रतिनिधी)