तिने मला 'ग्रीन टी'मधून गुंगीचं औषध दिलं, अन्...; श्रीकांत देशमुख यांना राजकीय कटाची शंका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 08:00 PM2022-07-12T20:00:24+5:302022-07-12T20:02:36+5:30

व्हायरल व्हिडिओत दिसते की, ही महिला सुरुवातीला मोबाईल कॅमेऱ्यासमोर हमसून-हमसून स्वतःचं नाव सांगते

Women gave me a sedative from Green Tea, BJP Shrikant Deshmukh suspects political conspiracy | तिने मला 'ग्रीन टी'मधून गुंगीचं औषध दिलं, अन्...; श्रीकांत देशमुख यांना राजकीय कटाची शंका

तिने मला 'ग्रीन टी'मधून गुंगीचं औषध दिलं, अन्...; श्रीकांत देशमुख यांना राजकीय कटाची शंका

googlenewsNext

ग्रीन टीमधून गुंगीचे औषध दिले, भाजप नेत्याचा महिलेवरच आरोप


सोलापूर : भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा बेडरुममधील खळबळजनक व्हीडिओ एका महिलेने व्हायरल केला. तसेच गेल्या तीन वर्षांपासून आपण पत्नी म्हणूनच त्यांच्या सोबत राहतोय, अशी तिची ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर जोरात फिरली. त्यानंतर भाजपच्या वरिष्ठांनी आदेश देताच श्रीकांत देशमुख यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर, घडल्या प्रकाराबद्दल त्यांनी आपली बाजू मीडियासमोर मांडली आहे. संबंधित महिलेने गुंगीचे औषध दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

व्हायरल व्हिडिओत दिसते की, ही महिला सुरुवातीला मोबाईल कॅमेऱ्यासमोर हमसून-हमसून स्वतःचं नाव सांगते. तिच्या गळ्यात मंगळसूत्रही दिसते. नंतर आलिशान बेडरूममधील डबल बेडवर अंतर्वस्त्रावर बसलेल्या श्रीकांत देशमुख यांच्याकडे मोबाईलचा कॅमेरा फिरवत ती म्हणते की, 'हा जो माणूस आहे, नाव श्रीकांत देशमुख आहे. यानं मला फसवलं आहे. हा बायकोबरोबरच संबंध ठेवून माझ्याशी संबंध ठेवतोय. लग्न करतोय हा,'

सुरुवातीला काय चालले आहे, हे न समजल्याने गोंधळलेले देशमुख बेडवरून उठतात. त्या महिलेच्या अंगावर धावून येत मोबाईलवरील व्हिडिओ बंद करण्यासाठी ढकला-ढकली करतात. याचवेळी ती महिला म्हणते, 'नाही. आता तू बघंच... तुला नाही सोडणार. तू माझ्याशी का खोटं बोलला ?'
मात्र ती चवताळून बोलत असतानाच कॅमेरा बंद केला जातो. हा व्हिडिओ सोशल मिडियावर मंगळवारी व्हायरल झाला. त्यानंतर भाजप पक्षातील वरिष्ठ यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यांनी तत्काळ श्रीकांत देशमुख यांचा राजीनामा घेतला. विशेष म्हणजे पक्षाच्या लेटरहेडवरील हा राजीनामाही घाईघाईने सोशल मीडियावर टाकण्यात संबंधित कार्यकर्तेच धडपड करीत होते.

काय म्हणाले श्रीकांत देशमुख !

श्रीकांत देशमुख यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठविलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, या महिलेने ग्रीन टी मध्ये गुंगीचे औषध घालून माझ्याबरोबर आक्षेपजनक व्हीडिओ बनविला. त्यानंतर चारित्र हननाचा प्रयत्न केला. यात राजकीय विरोधकांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे, तसेच संबंधित महिलेविरुद्ध मी ओशिवारा अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये हनी ट्रॅपिंग व खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

ऑडिओ क्लीपमध्ये लग्नाचा उल्लेख

देशमुख आणि संबंधित महिला यांच्यातील १७ मिनिटांची ऑडिओ क्लीपही व्हायरल झाली आहे. मोबाईलवर बोलताना या महिलेने देशमुखांना म्हटले आहे की, बाळासाठी मी तुमच्यावर प्रेम केले. लग्न केले. तीन वर्षे सोबत राहिले. तरीही मलाच बदनाम केले जात आहे. मी आता तुम्हाला सोडणार नाही. फडणवीसांशीही या विषयावर सविस्तर बोलणार आहे. तुम्ही आता आमदार कसे होता, हे पाहते. माझी हाय तुम्हाला लागली आहे.

Web Title: Women gave me a sedative from Green Tea, BJP Shrikant Deshmukh suspects political conspiracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.